चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवात

चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवात
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवात

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली चक्रीवादळ गुरुवारी (ता. ११) ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे ओडिसातील गजपती, गंजम, नयागड कांढामाळ आणि रायगड परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. परिणामी अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.  शुक्रवारी (ता. १२) या चक्रीवादाची तीव्रता कमी होण्यास सुरवात झाली असून ते पुढे गोपाळपूरकडे सरकत आहे.   ओडिसाच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर या चक्रीवादळाच्या वाऱ्याचा ताशी वेग ८०- ९० किलोमीटर एवढा होता. त्यानंतर तो कमी होऊन ताशी वेग ५५ ते ६५ किलोमीटरपर्यंत खाली आहे. आज (ता. १२) या चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल. अरबी समुद्रातील लुबन हे चक्रीवादळ अतितिव्र झाले आहे. त्यामुळे समुद्रातील लाटांचा वेग वाढला आहे. मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही चक्रीवादळाच्या प्रणालीमुळे गुरुवारी (ता. ११) दिवसभर राज्यातील काही भागात ढगाळ हवामान होते. अनेक भागांत उन्हाचा पारा चढून उकाड्यात वाढ झाली होती.  लुबन चक्रीवादळाचा प्रवाह अधिक असल्याने वारे वेगाने वाहत आहे. गुरुवारी वाऱ्याचा ताशी वेग १४५ ते १६० किलोमीटर एवढा होता. आज या वाऱ्याचा वेग ताशी १३० ते १५० किलोमीटरच्या दरम्यान राहणार आहे. चक्रीवादळ ओमानमधील सलालाहच्या किनारपट्टीपासून ५००, तर येमेनमधील साकोट्रापासून ४९०, तर अलगैदाहपासन ६७० किलोमीटर अंतरावर असून ते दक्षिण ओमानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आकाश निरभ्र झाले असून कमाल तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भातील अकोला येथे ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.  

गुरुवारी (ता. ११) सकाळच्या चोवीस तासांतील कमाल तापमान, अंश सेल्सिअसमध्ये-   मुंबई ३३.०, सांताक्रूझ ३३.२, अलिबाग ३३.०, रत्नागिरी ३२.५, डहाणू ३२.६, पुणे ३४.३, कोल्हापूर ३२.६, महाबळेश्वर २७.३, मालेगाव ३६.४, नाशिक ३४.७, सांगली ३२.६, सातारा ३२.८, सोलापूर ३६.२, औरंगाबाद ३५.५, परभणी ३५.७, नांदेड ३५.०, अकोला ३७.७, अमरावती ३७.२, बुलढाणा ३४.५, चंद्रपूर ३६.०, गोंदिया ३३.०, नागपूर ३४.०, वर्धा ३५.९, यवतमाळ ३६.०. आठ जणांचा मृत्यू आंध्रप्रदेश, ओडिसा किनारपट्टीवर धडकलेल्या 'तितली' या चक्रीवादळामुळे आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हे ८ ही जण आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यातील रहिवासी होते. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाला.' अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. ओडिशाच्या किनाऱ्यालाही या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. हवामान विभागाकडून यापूर्वीच येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com