agriculture news in marathi, daily seven crore loss of milk producers | Agrowon

दूध उत्पादकांना रोज सात कोटींचा फटका
सुदर्शन सुतार
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

शासनाने घेतलेल्या निर्णयाची दूध संघांकडून अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. सध्याचा दुधाचा उत्पादन खर्च पाहता, शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहत नाही, वास्तविक, सहकारी दूध संघाच्या प्रत्येक प्लॅन्टला सरकार मदत करते, अनुदान देते, पण शेतकऱ्यांना अनुदानावर चारा किंवा गाई मिळत नाहीत.
-पद्माकर भोसले, दूध उत्पादक, पापरी, ता. मोहोळ

सोलापूर : राज्यातील सहकारी दूध संघांनी गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर 27 रुपये इतका खरेदीदर द्यावा, असे बंधन घालूनही राज्यातील सहकारी दूध संघ अडचणींचा पाढा वाचत, या निर्णयाला जुमेनासे झाले आहेत. आता तर बहुतांश दूध संघांनी 27 रुपयांचा दर 20 रुपयांवर आणला आहे. परिणामी, प्रतिलिटरमागे सात रुपयांची तूट शेतकऱ्यांना सोसावी लागते आहे. राज्यात दिवसाकाठी एक कोटी लिटर दूध संकलन होते, या सगळ्याचा हिशेब घातल्यास दिवसाकाठी सात कोटींचा फटका सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांमार्फत सर्वाधिक गाईचे दूध संकलन होते. राज्यातील रोजचे संकलन जवळपास सव्वा कोटी लिटरपर्यंत आहे. त्यात सर्वाधिक 1 कोटी लिटर दूध गाईचे आणि 25 लाख लिटर म्हशीचे दूध संकलन होते. शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर 19 जूनला सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर 27 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 37 रुपये इतका दर ठरवला. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तातडीने आदेशही काढले. पण सहकारी दूध संघांनी अडचणी सांगत या निर्णयाला विरोध केला.

त्यासाठी काही दूध संघांनी वेगवेगळ्या क्‍लृप्त्याही वापरल्या. त्यातून 27 रुपयांचा दर कधी 23, कधी 22 करत आता तो 20 रुपयांवर आणून ठेवला. मुख्यतः दुधाची गुणप्रत कमी दाखविणे, प्रोटिनची कमतरता दाखवणे, असे प्रकार करत दुधाचे दर उतरविले. त्याच्या जोडीला संघांची आर्थिक परिस्थितीही दाखवली आणि सरकारच्या आदेशाला "पद्धतशीर' पाकीटबंद करून टाकले.

सहकारी संघांच्या या निर्णयामुळे मात्र शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. म्हशीच्या दूधदराबाबत फारशी चर्चा होत नाही, पण गाईच्या दुधाचे संकलन जास्त असल्याने त्याच्या दराबाबत मात्र शेतकऱ्यांची सर्वाधिक कोंडी केली जाते. सहकारी संघ आपल्या अडचणी मांडत सरकारशी भांडत आहेत, पण शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताचा कोणीच विचार करीत नाही.

नोटिसांचा सोपस्कार
राज्यातील कमी दर देणाऱ्या सहकारी दूध संघांना सहनिबंधकांनी (दुग्ध) यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामध्ये संघांना उत्तरासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती, त्यामध्ये या बेफिकिरीबद्दल संचालक मंडळावरही जबाबदारी निश्‍चित करण्याचे निर्देश दिले होते. पण संघांनीही नोटिशीतील कारणांना उत्तराचा सोपस्कार पूर्ण केला. पण पुढे काहीच झाले नाही.

खासगी दूध संघांचेही फावले
दूधदराच्या या स्पर्धेमध्ये खासगी संघही चांगलेच हात धुऊन घेत आहेत. वास्तविक, या स्पर्धेत त्यांनी जादा दर देऊन संकलन वाढवले पाहिजे, पण तेही सहकारी दूध संघांच्या या भूमिकेचा फायदा घेत याच दराने शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी करत आहेत.

लवकर तोडगा निघेल
दूधदराबाबत समिती नेमली आहे, बैठकाही सुरू आहेत. कमी दराबाबत सहकारी दूध संघांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर त्यांनी त्यांच्या आर्थिक अडचणी मांडल्या आहेत. वास्तविक, संघ आणि शेतकरी या दोघांचाही विचार आम्हाला करावा लागेल. लवकरच याबाबत काही तरी तोडगा निघेल, असे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त आर. आर. जाधव यांनी स्पष्ट केले.  

 

इतर अॅग्रो विशेष
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...
‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...