agriculture news in marathi, Daily sunshine hope for rabbi season | Agrowon

दिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने मराठवाड्यातील रब्बीच्या आशेवर संक्रांत आली आहे. कोरडवाहू ज्वारी, हरभऱ्याची पेरणीची वेळ निघून गेली आहे. संरक्षित सिंचनाची सोय असणारेच रब्बी हंगामाची पेरणी करू शकतील, अशी स्थिती आहे.

औरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने मराठवाड्यातील रब्बीच्या आशेवर संक्रांत आली आहे. कोरडवाहू ज्वारी, हरभऱ्याची पेरणीची वेळ निघून गेली आहे. संरक्षित सिंचनाची सोय असणारेच रब्बी हंगामाची पेरणी करू शकतील, अशी स्थिती आहे.

मराठवाड्यात यंदा सुमारे २० लाख हेक्‍टरवर रब्बीच्या पेरणीचे नियोजन होते. तूर्त कृषी विभागाकडे विशेषतः औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत रब्बीची पेरणी झाल्याची नोंद नाही. बागायती, ज्वारी व हरभऱ्याची पेरणी करण्यासाठी ऑक्‍टोबर अखेरपर्यंत अवधी आहे. गव्हाची नोव्हेंबरअखेरपर्यंत पेरणी करता येत असल्याचे तज्ज्ञ सांगत असले तरी ही पिके सिंचनाखाली घेण्यासाठी पाण्याची उपलब्धता नाही.

घटलेल्या भूजल पातळीमुळे औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील विहिरींनी ऑक्‍टोबरमध्येच तळ गाठला आहे. बहुतांश विहिरी उपस्यावर आल्या आहेत. त्यामुळे यंदाचे रब्बीचे नियोजन कागदावरच राहण्याची शक्‍यता जास्त आहे. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सोय असेल त्यांनी रिले क्राॅपिंगचा पर्याय निवडला आहे. संरक्षित सिंचन केल्या जात असलेल्या कपाशीत हरभरा, करडई, ज्वारीसारख्या पिकांची पेरणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थात असे क्षेत्र फारच तुरळक आहे. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांना जायकवाडीतील पाण्याचा मोठा आधार आहे. परंतु यंदा जायकवाडी प्रकल्पातच जवळपास १७२ दलघमीची तूट आहे.

संरक्षित सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी करण्याची इच्छा असल्यास एकच पीक न घेता आंतरपीक घेण्याला प्राधान्य द्यावे. कळी अवस्थेतील तुरीला उपलब्धतेनुसार संरक्षित सिंचन देऊन शेंगमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिफारशीनुसार फवारणी घ्यावी.
- डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ, केव्हीके औरंगाबाद

इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
राज्याच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग...सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच...
नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांनी गाठला तळनागपूर  ः मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या...
चांदवड तालुका खरेदी-विक्री संघावर...नाशिक : चांदवड तालुका खरेदी- विक्री संघाने...
सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागली...सांगली ः गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
वाघूरचे पाणी कापूस लागवडीसाठी देणार ः...जळगाव : वाघूर धरणातून धरण लाभक्षेत्रात शेतीसाठी...
जामनी शिवारात प्रतिबंधित बियाणे जप्तवर्धा ः कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची लागवड...
खरिपासाठी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला...अकोला ः या हंगामासाठी महाबीजचे सोयाबीन व इतर...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
सोलापुरातील कांदा अनुदानाचा ३८७ कोटी...सोलापूर : कांद्याचे दर घसरल्याने गेल्या वर्षी...
पाण्याचे राजकारण नको : उदयनराजेसोलापूर  : ‘‘आपण पाण्यावरून कधीही राजकारण...
लोहा, कंधारमधील शेतकऱ्यांना दुष्काळी...माळकोळी, जि. नांदेड : लोहा आणि कंधार तालुक्यांत...
आषाढी वारीच्या पालखी मार्गावर टॅंकरने...सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांना...औरंगाबाद : कृषी विभागातर्फे राबविल्या...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
नांदेड विभागात ऊस क्षेत्रात ६० हजार...नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...