दुधाला कमी दर देणारे संघ बरखास्त करणार : मुख्यमंत्री

दुधाला कमी दर देणारे संघ बरखास्त करणार : मुख्यमंत्री
दुधाला कमी दर देणारे संघ बरखास्त करणार : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांना राज्य सरकारने ठरविलेला दुधाचा दर न देणाऱ्या दूध संघांना बरखास्त करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.३) दिला. राज्यात मोफत दूधवाटप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘राज्य सरकारने गाईच्या दुधासाठी २७ रुपये प्रतिलिटर दर निश्चित केला आहे. मात्र सरकारने ठरविलेला दुधाचा हा दर दूध संघांकडून दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल आडमुठी भूमिका घेणाऱ्या दूध संघांवर राज्य सरकार कडक कारवाई करणार आहे.’’ मुख्यमंत्र्यांनी या वेळी सरकार राज्याचा दुधाच्या एका ब्रँडसाठी आग्रही असल्याचे सांगितले. त्यासाठी १० बैठका झाल्या, मात्र अजूनही निर्णय होऊ शकलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com