agriculture news in Marathi, Dairy, fisheries farmer will get benefit under kisan credit card, Maharashtra | Agrowon

डेअरी, मत्स्य उत्पादकांना मिळेल कृषिकर्ज
वृत्तसेवा
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली ः देशातील डेअरी आणि मत्स्य उत्पादकांना कृषिकर्जाचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार डेअरी आणि मत्स्यपालन या दोन्ही व्यवसायांचा किसान क्रेडिट कार्ड याेजनेअंतर्गत समावेश करणार आहे. येत्या आठवडाभरात या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ‘‘सरकारच्या निर्णयामुळे डेअरी आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल आणि व्यवसायासाठी आवश्‍यक असलेला पतपुरवठा होईल,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली ः देशातील डेअरी आणि मत्स्य उत्पादकांना कृषिकर्जाचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार डेअरी आणि मत्स्यपालन या दोन्ही व्यवसायांचा किसान क्रेडिट कार्ड याेजनेअंतर्गत समावेश करणार आहे. येत्या आठवडाभरात या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ‘‘सरकारच्या निर्णयामुळे डेअरी आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल आणि व्यवसायासाठी आवश्‍यक असलेला पतपुरवठा होईल,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

देशात डेअरी उद्योग गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे. देशातील कोट्यवधी लोक या दोन्ही व्यवसायांमध्ये गुंतलेले आहेत, परंतु अडचणीच्या काळात किंवा व्यवसायाचा विस्तार करावयाचा असल्यास या उद्योगांना सहजासहजी कर्जे उपलब्ध होत नाहीत. कर्जावरील व्याजदरही अधिक असतात. त्यामुळे व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. 
हवामानातील अनिश्‍चितता, वाढते शहरीकरण आणि शेती उत्पन्नात होणारी घट अशा अनेक कारणांमुळे पिकाखालील जमीन ही स्थिर आहे किंवा कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनाव्यतिरिक्त इतर व्यवसायाकडे वळविणे सरकारला आवश्‍यक बनले आहे. 

शासनाचे पाठबळ
किसान क्रेडिट कार्डअंतर्गत कर्ज घेतल्यास त्यावर केवळ २ ते ३ टक्के व्याजदर आहे. मात्र इतर व्यवसायांसाठी कर्जे घेतल्यास त्याचा व्याजदर ८ टक्क्यांपासून सुरू होतो. डेअरी आणि मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डअंतर्गत आणण्यासाठी सरकारने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधीसाठी २५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देशात पशुधनांची संख्या आणि उत्पादन वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

रिझर्व्ह बॅंकेची सूचना
सध्या किसान क्रेडिट कार्डअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची स्वतःची मालकीची शेती आहे आणि त्यावर ते पीक घेतात त्यांनाच कर्ज मिळते. डेअरी आणि मत्स्यपालन करणारे शेतकरी हे मोठ्या प्रमाणात भूमिहीन आहेत. त्यामुळे त्यांना कर्जे मिळण्यात अडचणी येतात. त्यांची कर्जपुरवठ्यातील अडचण दूर व्हावी यासाठी या व्यवसायांचा समावेश किसान क्रेडिट कार्डमध्ये करण्यात आला आहे. ‘‘सध्याच्या किसान क्रेडिट कार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करून या योजनेच्या कक्षेत डेअरी आणि मत्स्यपालन व्यवसायाचाही समावेश करावा,असे रिझर्व्ह बॅंकेनेही म्हटले आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...