दुग्धजन्य पदार्थांचा दर निर्देशांक वधारला
वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017
रोम, इटली ः अशियातून बटर, चीज आदी दुग्धजन्य पदार्थांना वाढलेली मागणी, तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपीय देशांतून मर्यादित पुरवठा राहिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दुग्धजन्य पदार्थांचा दर निर्देशांक यंदा २७.४ टक्‍क्‍यांनी वाढला आहे.
 
तसेच खाद्यतेलाचा निर्देशांकही वधारला आहे. मात्र साखरेचा दर निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्‍क्‍यांनी घसरला आहे, असे अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
 
रोम, इटली ः अशियातून बटर, चीज आदी दुग्धजन्य पदार्थांना वाढलेली मागणी, तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपीय देशांतून मर्यादित पुरवठा राहिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दुग्धजन्य पदार्थांचा दर निर्देशांक यंदा २७.४ टक्‍क्‍यांनी वाढला आहे.
 
तसेच खाद्यतेलाचा निर्देशांकही वधारला आहे. मात्र साखरेचा दर निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्‍क्‍यांनी घसरला आहे, असे अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
 
दूध पावडरची मागणी कमी झाली आहे. मात्र अन्य दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढल्याने त्याचा परिणाम दुधाच्या दरावर झाला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा निर्देशांक २.१ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. तर सध्याचा दर निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी २७.४ टक्‍क्‍यांनी अधिक आहे. 

 दरम्यान, जागतिक स्तरावर तृणधान्यांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ टक्‍क्‍यांनी अधिक राहिले आहेत. मात्र सप्टेंबरमध्ये एक टक्‍क्‍याने त्यात घट झाली आहे. विशेषतः मक्‍याच्या दरात घसरण झाली आहे. दक्षिण अमेरिकेतून मक्‍याचा पुरवठा वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे.

रशियातील गहू उत्पादनात सुधारणा झाल्याने गव्हाचे दर कमी राहिले आहेत. तांदळाचा मर्यादित पुरवठा आणि उच्च दर्जाच्या तांदळाची अधिक मागणी राहिल्याने दरात वाढ झाली आहे. 

`एफएओ'चा अन्न दर निर्देशांक

  • दूध पावडरची मागणी कमी झाली
  • बटर, चीज आदी दुग्धजन्य पदार्थांना मागणी अधिक
  • तृणधान्यांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अाठ टक्‍क्‍यांनी अधिक
  • दक्षिण अमेरिकेतून मक्‍याचा पुरवठा वाढल्याने दरात घसरण
  •  रशियातील गहू उत्पादनात सुधारणा झाल्याने दर कमी राहिले
  •  उच्च दर्जाच्या तांदळाला मागणी अधिक

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...