agriculture news in Marathi, dalmill setup by women farmers producers company, Maharashtra | Agrowon

महिला शेतकरी कंपनीने थाटला डाळमिल प्रकल्प
गोपाल हागे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

बुलडाणा ः जिल्ह्यातील महिलांची असलेल्या जीवनसांगिनी कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीने आता डाळमिल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाचा मोताळा तालुक्यातील शेलापूर बुद्रुक येथे रविवारी (ता. १५) शुभारंभ करण्यात आला. प्रकल्पाचे उद्घाटन नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक सुभाष बोदाडे यांच्या हस्ते झाले. या वेळी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप नाफडे, शेलापूरचे सरपंच उमेश वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बुलडाणा ः जिल्ह्यातील महिलांची असलेल्या जीवनसांगिनी कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीने आता डाळमिल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाचा मोताळा तालुक्यातील शेलापूर बुद्रुक येथे रविवारी (ता. १५) शुभारंभ करण्यात आला. प्रकल्पाचे उद्घाटन नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक सुभाष बोदाडे यांच्या हस्ते झाले. या वेळी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप नाफडे, शेलापूरचे सरपंच उमेश वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जीवनसांगिनी कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये पाचशेपेक्षा जास्त महिला सभासद असून, सदर कंपनीची स्थापना सन २०१३ मध्ये झालेली आहे. या कंपनीद्वारा आतापर्यंत शेतकऱ्यांची तूर व हरभरा खरेदी, सभासदांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, प्रशिक्षण अशा विविध उपक्रम राबविण्यात आले असून, महाराष्ट्रातील पहिली महिला शेतकरी उत्पादक कंपनी अशी या कंपनीची नोंद आहे. कंपनीच्या या उपक्रमाने सभासद शेतकऱ्यांना फायदा होणार असून, परिसरातील इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा लाभ दिला जाणार आहे.

या उद्घाटनप्रसंगी सरपंच श्री. वाघ यांनी या कंपनीकडून उत्पादित होणाऱ्या डाळीच्या प्रचारासाठी ग्रामपंचायतीमार्फत ५००० रुपये मदत जाहीर केली. नाबार्डसुद्धा कंपनीला सहकार्य करू शकते याचा ऊहापोह श्री. बोंदाडे यांनी केला.

अमित नाफडे यांनी कंपनीच्या वाटचालीची माहिती दिली. शालिनी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दीपाली मानकर यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी कंपनीच्या संचालिका संगीता झोपे, पुष्पा नारखेडे, सुलोचना तायडे व शीला चोपडे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...