कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची पाणीपातळी घटली

धरणे भरली; नद्यांची पाणीपातळी घटली
धरणे भरली; नद्यांची पाणीपातळी घटली

कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील नद्यांची पातळी सरासरी तब्बल वीस ते पंचवीस फुटांनी कमी झाली आहे. ज्या नद्या पंधरा दिवसांपूर्वी धोकादायक पातळीवरून वाहत होत्या. त्या नद्या आता कोरड्या पडू लागल्याचे अविश्‍वसनीय चित्र दिसत आहे. काही नदीपात्रांमध्ये तर एका काठावरून दुसऱ्या काठावर चालत जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि नद्यांची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्याचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच व्यस्त झाले आहे.

जलसंपदा विभागाने मात्र याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. जोपर्यंत शेतकरी व स्थानिक पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याबाबत मागणी येत नाही, तोपर्यंत आम्ही पाणी सोडणार नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे.

पंधरवड्यात पालटली पाण्याची स्थिती पावसाळा सुरू झाल्यापासून पश्‍चिम भागात सातत्याने पाऊस सुरू झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून बहुतांशी नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सतत पाऊस पडत असल्याने ऑगस्टमध्येच जिल्ह्यातील शंभर टक्के धरणे भरली. ऑगस्टच्या उत्तरार्धात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणावरील ताण कमी करण्यासाठी पाणी नदीपात्रात सोडण्यात येऊ लागले. शंभर टक्के धरणे भरल्याने जास्तीत जास्त पाणी नद्याच्या पाणीपात्रात सोडण्यात येऊ लागले. राधानगरी धरणासारख्या स्वयंचलित दरवाजामधूनही आठवडाभर पाणी नदीपात्रात येत होते. यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. जिल्ह्यातील शंभर बंधारे पाण्याखाली गेले.

१ सप्टेंबरला कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २४ फूट, सुर्वे २३ फूट ४ इंच, रुई ५३ फूट ९ इंच, इचलकरंजी ५१ फूट ३ इंच, तेरवाड ४६ फूट ६ इंच, शिरोळ ४० फूट, नृसिंहवाडी ३८ फूट इतकी होती. पाऊस नसलेल्या पूर्व भागातही नद्यांच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. तर मंगळवारी (ता. १८) मिळालेल्या आकडेवारीनुसार राजाराम बंधाऱ्यात ७ फूट, सुर्वे ११ फूट, रुई ३७ फूट २ इंच, इचलकरंजी ३३ फूट ३ इंच, तेरवाड ३२ फूट ६ इंच, शिरोळ २४ फूट, नृसिंहवाडी बंधाऱ्यात २३ फूट इतकी पाणीपातळी आहे.

अशी आहे सध्याची स्थिती एक सप्टेंबरनंतर मात्र चित्र बदलले. पावसाळी हवामान कमी होऊन उन्हाचा तडाखा सुरू झाला. यामुळे पाटबंधारे विभागाने धरणातून पाणी सोडणे बंद केले. वारणा धरणातून केवळ ६०० तर दूधगंगा धरणातून ४०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com