मराठवाड्याच्या घशाला कोरड

मराठवाड्याच्या घशाला कोरड
मराठवाड्याच्या घशाला कोरड

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची वाटचाल तळाच्या दिशेन सुरू झाली आहे. एकूण ८७२ प्रकल्पांपैकी २५७ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. ३१० प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठाही दहा टक्‍क्‍यांवर येऊन ठेपला आहे, तर ७५ पैकी ४७ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंबही नसल्याचे गंभीर चित्र आहे. 

मराठवाड्यातील ८७२ लघू, मध्यम, मोठ्या व बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ९.३४ टक्‍क्‍यांवर आला आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत १०.३१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. येलदर, माजलगाव, मांजरा व सिनाकोळेगाव या मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणी मायनसमध्ये गेले आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ४७ प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. २२ मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील ७, जालन्यातील ३, बीडमधील ८, उस्मानाबादमधील ४ प्रकल्पांचा समावेश आहे. 

औरंगाबादमधील १६ मध्यम प्रकल्पांत ३ टक्‍के, जालन्यातील ७ प्रकल्पांमध्ये १ टक्‍का, बीडमधील १६ प्रकल्पांत ५ टक्‍के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ७ टक्‍के, परभणीमधील दोन प्रकल्पांत ८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ७४९ लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ७ टक्‍क्‍यांवर येऊन ठेपला आहे. 

जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्यांची स्थिती बिकट आहे. औरंगाबादमधील ९३ लघू प्रकल्पांत १० टक्‍के, जालन्यातील ५७ लघू प्रकल्पांत १ टक्‍का, बीडमधील १२६ प्रकल्पांत २ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ३ टक्‍के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत ७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. २३५ लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील ४१, जालना ३९, बीडमधील ६८, लातूरमधील २५, उस्मानाबादमधील ६२ प्रकल्पांचा समावेश आहे. 

तीन वर्षांतील सर्वाधिक घट 

यंदा ७४९ लघू प्रकल्पांत १५ फेब्रुवारीअखेर असलेला ७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा तीन वर्षातील सर्वात नीचांकी पातळीचा ठरला आहे. २०१७ मध्ये याच तारखेअखेर लघू प्रकल्पांमध्ये ४४ टक्‍के, तर २०१८ मध्ये २८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. मध्यम प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठ्याचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. ७५ मध्यम प्रकल्पांत १५ फेब्रुवारी २०१७ अखेर ५४ टक्‍के, तर १५ फेब्रुवारी २०१८ अखेर ४० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र याच तारखेअखेर तो ७ टक्‍के इतकाच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com