agriculture news in marathi, Dam to near and dry Throat | Agrowon

धरण उशाला अन् कोरड घशाला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

महागाव, यवतमाळ : "धरण उशाला अन कोरड घशाला'' अशी अवस्था अधरपूस प्रकल्प असलेल्या महागाव तालुक्‍याची झाली आहे. कालव्यांची दुरवस्था झाल्याने प्रकल्पाचे पाणी टेलपर्यंत पाणी पोचलेच नाही. परिणामी सिचंनाचे स्वप्न अद्यापही पूर्ण झाले नाही. 

महागाव, यवतमाळ : "धरण उशाला अन कोरड घशाला'' अशी अवस्था अधरपूस प्रकल्प असलेल्या महागाव तालुक्‍याची झाली आहे. कालव्यांची दुरवस्था झाल्याने प्रकल्पाचे पाणी टेलपर्यंत पाणी पोचलेच नाही. परिणामी सिचंनाचे स्वप्न अद्यापही पूर्ण झाले नाही. 

महागाव तालुक्‍यात अधरपूस प्रकल्प, अमडापूर लघू प्रकल्प, जामनाला प्रकल्प, वडद लघू सिंचन प्रकल्प असे विविध प्रकल्प आहेत. या सर्वच प्रकल्पांत पाणीसाठा समाधानकारक आहे. मात्र, कालव्यांच्या एकूण लांबीच्या अर्ध्यातही पाणी पोचले नसल्याने प्रकल्प पांढराहत्ती ठरले आहेत. वेणी येथे अधरपूस प्रकल्पाची उभारणी होऊन आता ४० वर्षांचा काळ लोटला. या प्रकल्पातील पाण्याने दहा हजार हेक्‍टर शेती ओलिताखाली आणता येईल, असा दावा करण्यात आला. कागदोपत्री आराखडे आणि प्रत्यक्ष सिंचनक्षेत्रात कमालीची तफावत आहे. दहा हजार हेक्‍टर ओलिताचे लक्ष्य असलेला अधरपूस प्रकल्प दोन हजार हेक्‍टर शेतीचे सिंचन करण्यास असमर्थ ठरल्यामुळे या प्रकल्पाच्या उपयोगीतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे.

अधरपूस प्रकल्पाचा मुख्य कालवा तब्बल ६२ किलोमीटर लांबीचा आहे. मात्र कालव्याच्या अर्ध्या अंतरापर्यंतही पाणी पोचत नाही.  बारा किलोमीटर अंतरापर्यंत बारमाही पाणी देण्याचे नियोजन होते. मात्र याबाबत कुठलेही नियोजन नाही. शेतकऱ्यांना अद्यापही कोरडवाहू शेतवरच संसाराच गाडा चालवावा लागतो. कालव्याचे काम काळ्या मातीत करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गळती आहे. सिमेंट लायनींग केल्यास टेलपर्यंत पाणी पोचून शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. जामनाला प्रकल्पाची परिस्थितीदेखील यापेक्षा वेगळी नाही. प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन १४ वर्षे झाली. कालव्याची लांबी ३० किलोमीटर आहे. परंतु या कालव्याचे बांधकाम अर्धवट असून, पाणी केवळ दोन किलोमीटरपर्यंत पोचते.

अमडापूर प्रकल्पाची स्थितीदेखील अशीच आहे. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. प्रकल्पात काळी कसदार शेती गेली. या शेतीचा भाव एकरी दहा लाखावर असताना, शेतकऱ्यांना २० ते २५ हजार रुपये एकरी असा मोबदला मिळाला. हा प्रकल्प सुरवातीच्या चार वर्षांत भरेल असा अभियंत्यांचा कयास होता. मात्र प्रकल्प पहिल्याच पावसाळ्यात ओव्हरफ्लो झाला. त्यातील पाणीसाठा शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी ठरत असल्याचा आरोप आहे.

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...