agriculture news in marathi, dam storage level become decrease, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा २३ टीएमसीने घटला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालावत आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये पुण्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात तब्बल २३ टीएमसीने घट झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी (ता. १२) उजनीसह जिल्ह्यातील सर्व २५ धरणांमध्ये मिळून १६२ टीएमसी (७५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली असून, धरणांच्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.

पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालावत आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये पुण्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात तब्बल २३ टीएमसीने घट झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी (ता. १२) उजनीसह जिल्ह्यातील सर्व २५ धरणांमध्ये मिळून १६२ टीएमसी (७५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली असून, धरणांच्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.

उजनीसह जिल्ह्यातील सर्व २५ धरणांंची उपयुक्त पाणीसाठा क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. पंधरा दिवसांपूर्वी (२९ ऑक्टोबर) सर्व धरणांमध्ये १८५.४१ टीएमसी (८५ टक्के) पाणीसाठा होता. मात्र गेल्या पंधरवड्यात पाणीसाठ्यात तब्बल २३ टीएमसीहून अधिक (१० टक्के) घट झाल्याचे दिसून येत आहे. उजनी धरणातील अचल (६३.६५ टीएमसी) आणि उपयुक्त (३७.१६ टीएमसी) पाणीसाठ्याचा विचार करता धरणामध्ये एकूण १००.८१ टीएमसी (८६ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. उजनीतील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर धरण तळाशी गेले असून, खडकवासला, वरसगाव, पानशेतसह धरणांमध्ये मिळून सुमारे २२.९९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मुळा नदीच्या खोऱ्यातील पवना, मुळशी, भीमेच्या उपखोऱ्यातील चासकमान, भामा आसखेड धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. नीरा नदीच्या खोऱ्यातील नाझरे धरण जवळपास अचल पातळीत आहे. नीरा देवघर, भाटघर, गुंजवणीत चांगला पाणीसाठा असून, वीर धरणात निम्मा पाणीसाठा आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांमध्येही सध्या २१.९१ टीएमसी पाणी शिल्लक आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, घोड, चासकमान, खडकवासला, वीर आणि उजनी या धरणांच्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. माणिकडोह, भामा आसखेड, पवना, वरसगाव, पानशेत, खडकवासला, नीरा देवघर, भाटघर या धरणांमधून पॉवर हाउस, नदीपात्र, बंद पाइपलाइनमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यातच २५ टक्के पाणीसाठा कमी झाल्याने पुढील सात ते आठ महिन्यांत उर्वरित पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे लागणार आहे.
 
सोमवारी (ता. १२) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसी) कंसात टक्केवारी : टेमघर ०.२१ (६), वरसगाव १२.०४ (९४), पानशेत ९.२८ (८७), खडकवासला १.३७ (७०), पवना ७.२२ (८५), कासारसाई ०.४८ (८५), मुळशी १५.१४ (८२), कलमोडी १.५० (१००), चासकमान ५.७२ (७६), भामा अासखेड ६.१५ (८०), आंद्रा २.६५ (९१), वडीवळे १.०१ (९४), गुंजवणी २.७५ (७४), भाटघर २२.४६ (९६), नीरा देवघर १०.६८ (९१), वीर ४.११ (४४), नाझरे ०.०, माणिकडोह ४.८९ (४८), पिंपळगाव जोगे २.०८ (५४), येडगाव १.४२ (५१), वडज ०.७० (६०), डिंभे ९.९४ (८०), घोड २.८८ (५३).

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...