agriculture news in marathi, dam storage level status, marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील प्रकल्पांत ३३.६० टक्के उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

औरंगाबाद  : पावसाळ्याचा कालावधी संपत आलेला असताना मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट होताना दिसत आहे. मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांसह नद्यांवरील बंधारे मिळून ८६४ प्रकल्पांत केवळ ३३.६० टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम व लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा चिंतेत भर घालणारा आहे. शिवाय मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती फारशी समाधानकरक नसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद  : पावसाळ्याचा कालावधी संपत आलेला असताना मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट होताना दिसत आहे. मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांसह नद्यांवरील बंधारे मिळून ८६४ प्रकल्पांत केवळ ३३.६० टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम व लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा चिंतेत भर घालणारा आहे. शिवाय मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती फारशी समाधानकरक नसल्याचे चित्र आहे.

मराठवाडा पावसाच्या प्रदीर्घ खंडांचा सामना करतो आहे. पाऊस नसल्याने मराठवाड्यातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत नाही. १४ सप्टेंबरअखेरच्या आकडेवारीनुसार संकल्पित पाणीसाठ्याच्या तुलनेत मराठवाड्यातील एकूण ८६४ प्रकल्पांत केवळ ३३.९०  टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. ७ सप्टेंबरअखेरच्या अहवालानुसार हा पाणीसाठा ३४.२३ टक्‍के इतका होता. संकल्पित पाणीसाठ्याच्या तुलनेत गत आठवड्यात ३८.९७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असलेल्या ११ मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव व सिनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. शिवाय मांजरा व येलदरी प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक नाही.

७५ मध्यम प्रकल्पांपैकी जवळपास २८ प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामध्ये औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी ९, जालन्यातील ३, उस्मानाबादमधील ६ तर लातूर जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ७४५ लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थितीही चिंतेत भर घालणारी आहे. गत आठवड्यात २२.३७ टक्‍के  उपयुक्‍त असलेला लघू प्रकल्पांतील पाणीसाठा १४ सप्टेंबरअखेर २२.१८ टक्‍क्‍यांवर आला आहे.

गोदावरी नदीवरील ९ बंधाऱ्यांत ६० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असून तेरणा, मांजरा, रेणा नद्यांवरील २४ बंधाऱ्यांमध्येही केवळ २७.३८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. गत आठवड्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात जवळपास एक टक्‍क्‍याची घट नोंदली गेली आहे. शिवाय लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही एक टक्‍क्‍याची घट नोंदली गेल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले आहे. ७ सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील ११ प्रकल्पातील १.८५४० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याची नोंद होती. मात्र १४ सप्टेंबरअखेर २.२६०० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

इतर अॅग्रो विशेष
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
तहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...
साखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...
पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
कृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...
'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...
विदर्भाच्या काही भागांत थंडीची लाट पुणे : उत्तर भारतात थंडीच्या वाढलेल्या...
संत्रा पिकातील सिट्रीस ग्रिनिंग...नागपूर : जागतिकस्तरावर संत्रा पिकात अतिशय गंभीर...