agriculture news in marathi, dam storage level status, marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील ३२ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ३२ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. सध्या मोठे, मध्यम, लघू व नद्यांवरील बंधारे मिळून असलेल्या ८६४ प्रकल्पांत केवळ ११.४८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प अनेक वर्षांनंतर यंदा प्रथमच तुडूंब झाला होता. गत पावसाळ्याअखेर तुडूंब झालेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा आजघडीला २३ टक्‍क्‍यांवर आला आहे. दुसरीकडे अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिद्धेश्‍वर, ऊर्ध्व पेनगंगा व सिनाकोळेगाव या मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नसल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ३२ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. सध्या मोठे, मध्यम, लघू व नद्यांवरील बंधारे मिळून असलेल्या ८६४ प्रकल्पांत केवळ ११.४८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प अनेक वर्षांनंतर यंदा प्रथमच तुडूंब झाला होता. गत पावसाळ्याअखेर तुडूंब झालेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा आजघडीला २३ टक्‍क्‍यांवर आला आहे. दुसरीकडे अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिद्धेश्‍वर, ऊर्ध्व पेनगंगा व सिनाकोळेगाव या मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नसल्याची स्थिती आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत १२.१२, मध्यम प्रकल्पात ११.२४, लघु प्रकल्पात ७.६९, गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये २२.२० तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये केवळ २१. ३६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.  

सुरवात चांगली करणाऱ्या पावसाने नंतर मात्र दडी मारल्याने पाणीटंचाईचे ढग गडद होत असल्याचे चित्र आहे. शिवाय पाऊस असाच दडी मारून बसल्यास पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकांना पाण्याअभावी फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील सोळा मध्यम प्रकल्पांत केवळ १ टक्‍का उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत १०, बीडमधील १६ प्रकल्पांत १५, लातूरमधील ८ प्रकल्पांत १७,उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत १७, नांदेड जिल्ह्यातील ९ प्रकल्पांत १४ तर परभणी जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पात केवळ ३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाड्यातील ७४३ लघू प्रकल्पांपैकी २८४ लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील लघू प्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९० लघू प्रकल्पांत केवळ ४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पांत २, बीडमधील १२६ प्रकल्पांत ४, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ८, परभणीमधील २२ प्रकल्पांत ५ तर हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पांत केवळ ४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...