agriculture news in marathi, dam storage level status, marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा १२ टक्‍क्‍यांवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६७ मोठ्या, मध्यम, लघुप्रकल्पांसह बंधाऱ्यांतील उपयुक्‍त पाणीसाठा १२.४१ टक्‍क्‍यांवर आला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत एकूण पाणीसाठ्यात सुधारणा दिसत असली तरी ११ मोठ्या प्रकल्पांतील एकूण पाणीसाठ्यात किंचत घट नोंदली गेली आहे. २९ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त साठा संपुष्टात आला असून, जालन्यातील धामना प्रकल्प कोरडाठाक पडल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालातून स्पष्ट होते.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६७ मोठ्या, मध्यम, लघुप्रकल्पांसह बंधाऱ्यांतील उपयुक्‍त पाणीसाठा १२.४१ टक्‍क्‍यांवर आला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत एकूण पाणीसाठ्यात सुधारणा दिसत असली तरी ११ मोठ्या प्रकल्पांतील एकूण पाणीसाठ्यात किंचत घट नोंदली गेली आहे. २९ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त साठा संपुष्टात आला असून, जालन्यातील धामना प्रकल्प कोरडाठाक पडल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालातून स्पष्ट होते.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांचा उपयुक्‍त पाणीसाठा गत आठवड्याच्या तुलनेत किंचीत घटून १२.०७ टक्‍क्‍यांवर आला आहे. गत आठवड्यात मोठ्या ११ प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा १२.१२ टक्‍के होता. गत पावसाळ्यात तुडुंब झालेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा २१ टक्‍क्‍यांवर आला आहे. येलदरी, सिद्धेश्‍वर व सिनाकोळेगाव या मोठ्या प्रकल्पांत अजूनही उपयुक्‍त पाणीसाठा झालेला नाही. माजलगाव प्रकल्प एक टक्‍क्‍यावर, तर मांजरा प्रकल्प ७ टक्‍क्‍यांवर आला आहे.

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत गत आठवड्यात ११.५८ टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा २९ जुनअखेर १४.०७ टक्‍क्‍यांवर तर ७४६ लघुप्रकल्पांत ८.८४ टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा ९.९२ टक्‍क्‍यांवर गेला आहे. गोदावरी नदीवरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये गत आठवड्यात २१.५१ टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा २५.४९ टक्‍क्‍यांवर आला आहे.

दुसरीकडे तेरणा, मांजरा, रेणा आदी नद्यांवरील २४ बंधाऱ्यांमध्ये गत आठवड्यात २२.५१ टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा ३०.४३ टक्‍क्‍यांवर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत २, जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पात ९, परभणीमधील २ मध्यम प्रकल्पांत ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे.

लघुप्रकल्पांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ प्रकल्पांत ४, जालन्यातील ५७ प्रकल्पांत २, बीडमधील १२६ प्रकल्पांत ९, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ८ तर परभणीतील २२ प्रकल्पांत केवळ ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील २०१ प्रकल्पांत १४, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत १५ तर हिंगोली जिल्ह्यातील २७ लघुप्रकल्पांत २७ टक्के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी २९ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १३, जालन्यातील १, बीडमधील ६, लातूरमधील ३, उस्मानाबादमधील २, नांदेडमधील २ तर परभणी जिल्ह्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...