पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

गुंजवणी धरण
गुंजवणी धरण

पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. जिल्ह्यातील धरणांची एकूण क्षमता २१६.८४ टीएमसी असून, बुधवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत उजनीसह जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये मिळून सुमारे १०६ टीएमसी (सुमारे ४९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ओढ, नाले, नद्यांना दुथडी भरून वाहत असल्याने वडज, कळमोडी, वडीवळे, खडकवासला, गुंजवणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे निम्म्याहून अधिक भरली असून, कळमोडी व खडकवासला धरण पूर्णपणे भरले आहे. चासकमान, आंद्रा, कासारसाई, पानशेत धरणांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. पिंपळगाव जोगे आणि घोड धरणामध्ये पाणीपातळी अद्यापही अचल साठ्यात आहे. नाझरे धरणातही अत्यल्प पाणीसाठा असल्याचे पुणे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा अचल पातळीतून उपयुक्त पातळीत आला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत उजनी धरणामध्ये ३.३५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. अचल पातळीतील पाणीसाठ्याचा विचार करता उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने उजनीतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (टीएमसी) कंसात टक्केवारी : टेमघर २.१७ (५९), वरसगाव ७.४०(५८), पानशेत ९.१८ (८६), खडकवासला १.९७ (१००), वडीवळे ०.८१ (७५), आंद्रा २.५९ (८९), पवना ६.७६ (७९), कासारसाई ०.४७ (८४), मुळशी १३.९० (७५), कळमोडी १.५१ (१००), चासकमान ६.३८ (८४), भामा अासखेड ५.२२ (६८), भाटघर १४.७७ (६३), नीरा देवघर ७.०० (६०), गुंजवणी २.३७ (६४), वीर ७.०२ (७५), नाझरे ०.०१ (२), माणिकडोह ३.२२ (३२), १.५६ (५६), वडज ०.५६ (४८), डिंभे ७.८८ (६३).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com