पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ९३ टक्के पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणे ओव्हर फ्लो झाली. मात्र सप्टेंबरमधील पावसाच्या दडीने पावसाळा संपण्यापूर्वीच धरणांमधील पाणीपातळी कमी होण्यास सुरवात झाली. उजनीसह जिल्ह्यातील सर्व २५ धरणांंची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी असून, शनिवारी (ता.८) यात २०१.१३ टीएमसी (९३ टक्के) पाणीसाठा झाला होता.  पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची मागणी वाढणार असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.

मुठा खोऱ्यातील खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या धरणांमध्ये मिळून सुमारे २५.८६ टीएमसी (८९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. वरसगाव आणि पानशेत या धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी असले तरी टेमघरमध्ये अवघा ४१ तर खडकवासला धरणात ७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुळा नदीच्या खोऱ्यातील पवना, मुळशी, भीमेच्या उपखोऱ्यातील चासकमान धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. कळमोडी, भामा अासखेड या धरणांमध्येही १०० टक्के पाणीसाठा आहे. निरा नदीच्या खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर, गुंजवणी आणि वीर या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांमध्येही सध्या ३०.५६ टीएमसी (८५ टक्के) पाणी शिल्लक आहे.

रविवारी (ता.७) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी : टेमघर १.५१ (४१), वरसगाव १२.७६ (१००), पानशेत १०.०७ (९५), खडकवासला १.५२ (७७), पवना ८.१८ (९६), कासारसाई ०.५४ (९४), मुळशी १७.१६ (९३), कलमोडी १.५१ (१००), चासकमान ६.७० (८८), भामा अासखेड ७.६७ (१००), आंद्रा २.९१ (१००), वडीवळे १.०५ (९८), गुंजवणी ३.१० (८४), भाटघर २३.५० (१००), नीरा देवघर ११.७३ (१००), वीर ९.२८ (७७), नाझरे ०.०६ (१०), माणिकडोह ७.६५ (७५), पिंपळगाव जोगे २.५९ (६७), येडगाव २.२६ (८१), वडज १.१० (९४), डिंभे १२.३४ (९९), घोड ४.६२ (८५).

`उजनी`च्या पाणीसाठ्यात होणार घट पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण यंदाच्या पावसाळ्यात काठोकाठ भरले. ऑगस्ट महिन्यातच धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागला. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिल्याने `उजनी`ची पाणीपातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. उजनी धरणामध्ये रविवारी (ता.७) ११६.७५ टीएमसी एकूण पाणीसाठा होता. यातील ५३.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. पुढील काळात पाण्याची मागणी वाढणार असल्याने `उजनी`च्या पाणीसाठ्यातही घट होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com