agriculture news in marathi, dam storage level status, pune, maharashtra | Agrowon

राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्येही वेगाने घट होत असून, शुक्रवारी (ता. १६) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६६ प्रकल्पांमध्ये ७९६.४० टीएमसी (५५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असून, पुढील पावसाळ्यापर्यंतचे सात ते आठ महिने उर्वरित पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

पुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्येही वेगाने घट होत असून, शुक्रवारी (ता. १६) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६६ प्रकल्पांमध्ये ७९६.४० टीएमसी (५५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असून, पुढील पावसाळ्यापर्यंतचे सात ते आठ महिने उर्वरित पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

गतवर्षी याच तारखेला धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा होता, तर यंदा तुलनेने २० टक्के कमी पाणीसाठा आहे. राज्यातील १४० मोठ्या प्रकल्पांमध्ये ६१७.६२ टीएमसी (६० टक्के), मध्यम २५८ प्रकल्पांमध्ये ९४.४० टीएमसी (५३ टक्के) तर २८६८ लहान प्रकल्पांमध्ये ८४.३८ (३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने ओढ दिल्यानंतर पाण्याची मागणी वाढली असल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. मराठवाड्यासह राज्यातील काही धरणे लवकरच रिकामी होणार असून, पाणीटंचाईचे सावट आणखी गडद होणार आहे.

मराठवाड्याची चिंता वाढली
यंदा मराठवाड्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाने पाठ फिरविली आहे. या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाळा कसा काढायचा याची चिंता आतापासूनच भेडसावू लागली आहे. सर्व ९६५ प्रकल्पामंध्ये मिळून ५७.७२ टीएमसी म्हणजेच अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणात अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून ४९ टीएमसी (४८ टक्के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील उर्वरित धरणांनी नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठला आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ३६.५० टीएमसी (२३ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ७.४५ टीएमसी (२० टक्के), तर लहान ८३९ प्रकल्पांमध्ये १३.७३ टीएमसी (२१ टक्के) पाणी शिल्लक आहे.

पुणे विभागातील पाणीसाठ्यात घट
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सर्वच प्रमुख धरणे यंदा ‘ओव्हरफ्लाे’ झाली, मात्र पावसाने अखेरच्या टप्प्यात मोठी ओढ दिल्याने या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. प्रमुख धरणांपैकी उजनी धरणात उपयुक्त आणि अचल पाणीसाठा मिळून १०० टीएमसी (८६ टक्के), तर कोयना धरणामध्ये ८७ टीएमसी (८२ टक्के) पाणी शिल्लक आहे. इतरही प्रमुख धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. विभागातील सर्व ७२६ धरणांमध्ये मिळून सध्या ३८९.४८ टीएमसी (७३ टक्के) पाणीसाठा आहे. ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३४२.७७ टीएमसी (७८ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २८.४९ टीएमसी (५९ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये १८.२१ टीएमसी (३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

नाशिक विभागात ५७ टक्के पाणीसाठा
नाशिक विभागातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ५७१ प्रकल्पांमध्ये १२२.६८ टीएमसी (५७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून नुकताच विसर्ग करण्यात आला. पावसाळ्यात काठोकाठ भरल्याने पाणी सोडावे लागलेल्या धरणांचा उपयुक्त पाणीसाठा वेगाने खालावत आहे. उन्हाचा झळा वाढू लागताच पाणीपातळी आणखी कमी होणार आहे. नाशिक विभागातील मोठ्या २३ प्रकल्पांमध्ये ८७.७३ टीएमसी (६७ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये २०.७९ टीएमसी (४९ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये १४.१६ टीएमसी (३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

कोकणात गतवर्षीच्या तुलनेत कमी साठा
कोकणातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असून, यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी शिल्लक आहे. यंदा कोकणात ८२ टक्के पाणी शिल्लक असून, गतवर्षी याच तारखेला ८९ टक्के पाणीसाठा होता. कोकणात सर्व १७६ धरणांमध्ये मिळून यंदा १०१.४३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ७२.१६ टीएमसी (८३ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १५.०४ टीएमसी (८७ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पांत १४.२६ टीएमसी (७२ टक्के) पाणीसाठा आहे.

विदर्भात दुसऱ्या वर्षीही गंभीर स्थिती
विदर्भात सलग दुसऱ्या वर्षी धरणांमधील पाणीसाठा खालावला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात यंदा २९, तर अमरावती विभागात ५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी दोन्ही विभागांत प्रत्येकी ३८ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा असला तरी, पाण्यासाठ्यात चिंताजनक घट होत आहे. नागपूर विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ४७.४१ टीएमसी (२९ टक्के), तर अमरावती विभागात ७७.६९ टीएमसी (५२ टक्के) पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात अाले.
 

राज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)
विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा  शिल्लक साठा टक्केवारी
अमरावती ४४५ १४८.०० ७७.६९ ५२
कोकण १७६ १२३.९२  १०१.४३ ८२
नागपूर ३८४ १६२.६५ ४७.४१ २९
नाशिक  ५७० २०९.५० १२२.६८ ५७
पुणे ७२६ ५३७.०१ ३८९.४८ ७३
मराठवाडा ९६५ २६०.३४ ५७.७२ २२
एकूण ३२६६ १४४१.४१ ७९६.४० ५५

 

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...