agriculture news in marathi, dam storage level status, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यातील धरणांमध्ये २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जून 2018

सातारा  : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत जून महिन्याचा दुष्टीने समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांची एकूण क्षमता १४८.७४ टीएमसी असून, सध्या या धरणांमध्ये ३२.५९४ टीएमसी म्हणजेच २१.९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत तारळी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व धरणांत उपयुक्त पाणीसाठा अधिक आहे.

सातारा  : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत जून महिन्याचा दुष्टीने समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांची एकूण क्षमता १४८.७४ टीएमसी असून, सध्या या धरणांमध्ये ३२.५९४ टीएमसी म्हणजेच २१.९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत तारळी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व धरणांत उपयुक्त पाणीसाठा अधिक आहे.

जिल्ह्यातील उरमोडी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणांत केवळ १४ ते २२ टक्‍क्‍यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. वीजनिमिर्तीच्या दुष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात २२.९० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणात २२.८७ टक्के पाणी शिल्लक आहे. कोयना वगळता उरमोडी धरणात सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या या धरणात ४.४५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी व धोम-बलकवडी या धरणांत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा आहे. सध्या धोम धरणात १६.१७, कण्हेर धरणात १९.३३, उरमोडी धरणात ४६.१५, धोम-बलकवडी धरणात १४.४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तारळी धरणात मात्र गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी शिल्लक आहे. गतवर्षी दमदार पाऊस झाल्याने सर्व नद्या दुथडी भरून वाहिल्या होत्या. पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी सर्वच धरणांतून पाणी सोडावे लागले होते. पाण्याचे योग्य नियोजन झाल्यामुळे तारळी वगळता सर्वच धरणात अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्या पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्याने पाणीटंचाई कमी होण्यास मदत होत आहे. मॉन्सून वेळेत आल्यास धरणातील सध्याचे पाणी शिल्लक राहण्याबरोबरच पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
 

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची तुलनात्मक स्थिती (टीएमसी)
धरण २०१७ २०१८
कोयना १२.५२  २२.९०
धोम १.६४ १.८९
कण्हेर १.२२ १.८५
उरमोडी ४.४१ ४.४५
धोम-बलकवडी ०.०० ०.५७
तारळी १.३४७ ०.९३४

 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...