खानदेशातील आठ प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा

हतनूर धरण
हतनूर धरण

जळगाव : खानदेशातील आठ प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहेत. अनेक प्रकल्पांमध्ये ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यातील प्रकल्पांमध्ये मात्र जेमतेम पाणीसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील चार, धुळ्यातील तीन तर नंदुरबार जिल्ह्यातील एक प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील बहुळा, बोरी, अग्नावती, अंजनी या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा नसल्याने या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, अशी स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात तीन मोठे आणि १३ मध्यम प्रकल्प आहेत. धुळ्यात ११ मध्यम प्रकल्प, तर नंदुरबार जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. जळगाव जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. गिरणा, वाघूर हे प्रकल्प ६५ टक्‍क्‍यांवर भरले आहेत. या तिन्ही प्रकल्पांमधून रब्बीला आवर्तन सोडले जाईल. गिरणा धरणातून दोन आवर्तनांसाठी पाणी सोडले जाईल, अशी माहिती आहे.

धुळे जिल्ह्यातील सुलवाडे, सारंगखेडा बॅरेज, पांझरा, मालनगाव, जामखेडी बुराई, करवंद, अनेर या प्रकल्पांमध्येही बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. नंदुरबारमधील प्रकाशा बॅरेज, रंगावली, दरा या प्रकल्पांमध्येही चांगला पाणीसाठा आहे. धुळ्यातील अक्कलपाडा प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडले आहे. हे पाणी धुळे तालुक्‍यातील पूर्व पट्ट्यातील कापडणे, जापी आदी गावांसाठी काहीसे दिलासादायक आहे, असे शेतकरी आत्माराम पाटील (कापडणे, ता. धुळे) यांनी सांगितले.

परंतु शिंदखेडा तालुक्‍याचा पश्‍चिम भाग व नंदुरबारच्या पूर्व पट्ट्याला पाणीटंचाईच्या झळांचा सामना करावा लागू शकतो. या भागात पर्जन्यमान अतिशय कमी होते. नंदुरबारमधील चौपाळे, भालेर, रनाळे आदी गावांमध्ये सिंचनासाठी विहिरींना पुरेसे पाणी नसणार असे सांगण्यात आले.  १०० टक्के भरलेले प्रकल्प ः जळगाव - अभोरा, मंगरूळ, सुकी, हतनूर. धुळे - पांझरा, मालनगाव, जामखेडी. नंदुरबार - रंगावली. ९० टक्‍क्‍यांवर भरलेले प्रकल्प ः धुळे - सुलवाडे बॅरेज, सारंगखेडा बॅरेज, बुराई. नंदुरबार - प्रकाशा बॅरेज.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com