agriculture news in marathi, dam storage status in marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 मार्च 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ३६ टक्‍क्‍यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी व उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. दुसरीकडे निम्म मनार व विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीही झपाट्याने घटत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोळा मध्यम प्रकल्पांत केवळ ७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 
 
औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ३६ टक्‍क्‍यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी व उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. दुसरीकडे निम्म मनार व विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीही झपाट्याने घटत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोळा मध्यम प्रकल्पांत केवळ ७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 
 
मराठवाड्यात एकूण ८६४ प्रकल्पांपैकी ११ मोठ्या प्रकल्पांत ४० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी येलदरी प्रकल्पात ५ तर उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात ४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये ३६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात केवळ ७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.
 
लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ७४३ लघू प्रकल्पांत केवळ २३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात हिंगोली जिल्ह्यातील २७ लघु प्रकल्पांमध्ये १२, परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पात १०, नांदेड जिल्ह्यातील ८८ लघु प्रकल्पात १७, जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पात १६, औरंगाबाद जिल्ह्यातील ९० प्रकल्पात १६, बीड जिल्ह्यातील १२६ प्रकल्पात ३०, लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पात २८ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २०१ लघू प्रकल्पातही केवळ २८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 
 
गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये ४८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यात मुळी येथे असलेल्या बंधाऱ्यात उपयुक्‍त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. दुसरीकडे तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमध्ये २५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 
 
रेणापूर, घनसरगाव येथील बंधाऱ्यांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. बोरगाव, वांजरखेडा, खरोळा आदी ठिकाणच्या बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा तळाला गेल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी दहा मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ व नांदेड जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची...नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर...
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज...सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष...
भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे...मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश...
कृषिपंपांना भारनियमनाची समस्याजळगाव  ः जिल्ह्यात कृषिपंपांना भारनियमनाचा...
शेतीच्या प्रश्‍नांबाबत...जळगाव : कर्जमाफीचा घोळ, पीककर्ज वितरणाची...
पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना वाकोडीचे पद्माकर कोरडे यांची सहा एकर शेती....
सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा...आनंद पाटील अनेक वर्षे रासायनिक शेती करीत होते....
तंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने...कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील...
पाण्याचा नियंत्रित वापर, जमिनीच्या...कठोरा (ता. जि. जळगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी...
भविष्याचा वेध घेत शेतीत करतोय बदलअकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी...
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...