agriculture news in marathi, dam storage status in marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 मार्च 2018
औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा चिंताजनक स्थितीत असल्याचे चित्र आहे. ८६७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये केवळ ३२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ७४६ लघू प्रकल्पांत केवळ १८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 
 
मराठवाड्यातील एकूण ७५ मध्यम प्रकल्पांपैकी १० प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील लघू प्रकल्पांची तसेच औरंगाबाद व परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाण्याची टक्‍केवारी चिंता वाढवणारी आहे.
 
औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा चिंताजनक स्थितीत असल्याचे चित्र आहे. ८६७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये केवळ ३२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ७४६ लघू प्रकल्पांत केवळ १८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 
 
मराठवाड्यातील एकूण ७५ मध्यम प्रकल्पांपैकी १० प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील लघू प्रकल्पांची तसेच औरंगाबाद व परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाण्याची टक्‍केवारी चिंता वाढवणारी आहे.
 
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्येही येलदरी व उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात प्रत्येकी चार टक्‍के, तर निम्न मनार प्रकल्पात ११ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे 
 
मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवनदेखील पाणीसाठा घटण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच शंभर टक्‍के भरलेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठाही ६० टक्‍क्‍यांवर आला आहे. 
 
हिंगोली वगळता सात जिल्ह्यांतील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ३० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्येही औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांसह परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांत अनुक्रमे ५ व १५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.
 
मराठवाड्यातील ७४६ लघू प्रकल्पांत केवळ १८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत १२, जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पांत १३, परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पांत ९, तर हिंगोली जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत केवळ ८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 
 
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी दहा मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. यामध्ये सर्वाधिक ९ प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यातील असून, नांदेड जिल्ह्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.
 
जालना जिल्ह्यात ७ मध्यम प्रकल्पांत २७, बीड जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत ४९, उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांत ४५, नांदेड जिल्ह्यातील ९ प्रकल्पांत ३१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...