agriculture news in marathi, dam storage status in marathwada,maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ४७ टक्‍के उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जानेवारी 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये केवळ ४७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये मोठ्या प्रकल्पांसह मध्यम, लघू व तेरणा, मांजरा, रेणा नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असलेला उपयुक्‍त पाणीसाठा चिंतेत भर घालणारा आहे.

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये केवळ ४७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये मोठ्या प्रकल्पांसह मध्यम, लघू व तेरणा, मांजरा, रेणा नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असलेला उपयुक्‍त पाणीसाठा चिंतेत भर घालणारा आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याअखेर ४९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ ७५ मध्यम प्रकल्पांत ४८, ७४३ लघू प्रकल्पांत ३५, तेरणा, मांजरा, रेणा नद्यांवरील २४ बंधाऱ्यांमध्ये ४५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. केवळ गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांत असलेल्या ५८ टक्‍क्‍यांवरील उपयुक्‍त पाणीसाठाच काय तो दिलासा देणारा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती कमालीची चिंताजनक असून, या प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. या संपूर्ण प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा दहा टक्‍क्‍यांवर आला आहे. जानेवारी २०१७ मध्ये मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत ६३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता.

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे ३ प्रकल्पांत ५० ते ७५, तर २ मोठ्या प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाड्यातील ७४३ लघू प्रकल्पांपैकी ३०३ लघू प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. केवळ ८५ प्रकल्पांमध्येच ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. जानेवारी २०१७ मध्ये मराठवाड्यातील लघू प्रकल्पांमध्ये ५५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...