agriculture news in marathi, dam storage status in pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब
संदीप नवले
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017
पुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब भरली आहेत. भाटघर, पवना, वडज धरण क्षेत्रात रविवारी (ता. १५) पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील बारा धरणांतून विसर्ग सुरू आहे.
 
मुळशी, टेमघर, खडकवासला, कासारसाई, आंद्रा, भामा आसखेड, येडगाव आणि पिंपळगाव जोगे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.
 
पुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब भरली आहेत. भाटघर, पवना, वडज धरण क्षेत्रात रविवारी (ता. १५) पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील बारा धरणांतून विसर्ग सुरू आहे.
 
मुळशी, टेमघर, खडकवासला, कासारसाई, आंद्रा, भामा आसखेड, येडगाव आणि पिंपळगाव जोगे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.
 
पिंपळगाव जोगे, वडज, येडगाव, विसापूर, डिंभे, घोड, कळमोडी, चासकमान, आंद्रा, कासारसाई, गुंजवणी आणि वीर या बारा धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 
 
जिल्ह्यातील बहुतांशी धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामध्ये वरसगाव, पानशेत आणि खडकवासलासह डिंभे, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, भाटघर, नीरा देवधर आणि वीर या धरणांचा समावेश आहे. वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. मात्र, रविवारी दिवसभरात या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. त्यामुळे मुठा नदीत विसर्ग करण्यात आला नाही.
 
पिंपळगाव जोगे धरण ९६.०७, माणिकडोह ८३.१०, वडज ९९.९७, घोड ९९.७६, मुळशी ९७.०५, टेमघर ५४.०६, गुंजवणी ५८.९३, नाझरे धरण ५४.९८ टक्के भरले आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६३ मिमी पाऊस झाला. सध्या या धरणात ९७.०५ टक्के पाणीसाठा आहे.
खडकवासला धरण परिसरात २७ मिमी पावसाची नोंद झाली. घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २५, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २२, वडिवळे येथे २० आणि वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १७ मिमी पाऊस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
 
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस (मिमी) ः पिंपळगाव जोगे ६, माणिकडोह २, येडगाव ५, डिंभे १, विसापूर १४, कळमोडी ५, चासकमान ४, भामाआसखेड ५, आंद्रा ४, कासारसाई ७, मुळशी ६३, खडकवासला २७, घोड २५,  टेमघर २२, वडिवळे २०, वरसगाव १७, पानशेत १७, गुंजवणी २, नीरा देवधर २, वीर ४.  
 
शंभर टक्के भरलेली धरणे ः  येडगाव, डिंभे, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, वरसगाव, पानशेत, खडकवासला, नीरा देवधर, भाटघर, वीर. 

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...