agriculture news in marathi, dam storage status in pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणांत ९४ टीएमसी पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 मार्च 2018
पुणे  ः पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्यास मागणी वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत ९४.९३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी केले आहे. 
 
पुणे  ः पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्यास मागणी वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत ९४.९३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी केले आहे. 
 
पावसाळ्यात जिल्ह्यातील पश्‍चिम पटट्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २४ धरणे तुडुंब भरली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून धरणातील पाण्याचा वापर सुरू आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन प्रमुख शहरांना खडकवासला, पवना धरणांतून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच शेतीसाठीही पाणी धरणातून सोडले जात आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. मात्र, धरणातील घटत असलेली पाणीपातळी बघता पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची आवश्‍यकता आहे.
 
सध्या पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, घोड, कळमोडी या धरणांच्या डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू आहे. तसेच डिंभे, घोड, आंद्रा, पवना, खडकवासला, गुंजवणी धरणांतून उजव्या कालव्याद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने घटू लागली आहे. सध्या धरणांत मुबलक पाणीसाठा आहे; परंतु वेळेवर पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे, असेही जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
धरणनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये)  : पिंपळगाव जोगे १.७९, माणिकडोह ५.४३, येडगाव १.८६, वडज ०.६७, डिंभे, ७.४८, घोड ३.०३, विसापूर ०.६७, कळमोडी १.४६, चासकमान ३.९७, भामा आसखेड ५.७७, वडीवळे ३.६६, आंद्रा २.५३, पवना ४.८५, कासारसाई ०.३८, मुळशी ८.३५, वरसगाव ७.२५, पानशेत ७.१०, खडकवासला १.५५, गुंजवणी १.४६, नीरा देवधर ६.१९, भाटघर १६.३८, वीर ५.८८, नाझरे ०.२२.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...