agriculture news in marathi, dam storage status in pune region, maharashtra | Agrowon

पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 एप्रिल 2018
पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे विभागातील धरणांमधील पाणीपातळीत झपाट्याने घट होण्यास सुरवात झाली आहे. विभागातील ७२५ मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ५३७.४४ टीएमसी असून, रविवारी (ता. २२) या प्रकल्पांमध्ये मिळून २११.४० टीएमसी (३९.३३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तापमानात वाढ होणार असल्याने पाण्याची मागणी आणि बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे उर्वरित पाण्याचे जपून नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे. 
 
पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे विभागातील धरणांमधील पाणीपातळीत झपाट्याने घट होण्यास सुरवात झाली आहे. विभागातील ७२५ मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ५३७.४४ टीएमसी असून, रविवारी (ता. २२) या प्रकल्पांमध्ये मिळून २११.४० टीएमसी (३९.३३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तापमानात वाढ होणार असल्याने पाण्याची मागणी आणि बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे उर्वरित पाण्याचे जपून नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे. 
 
पुणे विभागातील मोठ्या ३५ प्रकल्पांमध्ये मिळून १७६.७७ टीएमसी (४०.१९ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये १९.५६ टीएमसी (४०.६९ टक्के), तर ६४० लघू प्रकल्पांमध्ये १४.९७ टीएमसी (३०.४२ टक्के) पाणीसाठा उपलब्ध अाहे.
 
गेल्या वर्षी याच तारखेला मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांमध्ये अनुक्रमे २४.९३, २९ आणि १९.०४ टक्के असा एकूण २४.७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. पुणे विभागात यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले अाहे.
 
पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पूर्णपणे भरलेल्या उजनी धरणात यंदा अद्यापही चांगल्या प्रमाणात पाणीसाठा आहे. या धरणात चल आणि अचल साठा मिळून ७५.८३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, यापैकी १२.१९ टीएमसी (२२.७५ टक्के) चल साठा आहे. कोयना धरणात एकूण ५५.२५ टीएमसी पाणीसाठा असून, यापैकी ५०.१० टीएमसी (५०.०६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.
 
गतवर्षी उजनी धरणामध्ये अवघा ४.६३, तर कोयना धरणामध्ये २६.८३ टक्के पाणीसाठा होता. उजनी, कोयनेसह साताऱ्यातील उरमोडी, धाेम, वीर, सांगलीतील वारणा, पुण्यातील भामा अासखेड, पानशेत, कोल्हापुरातील तुळशी या धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...