agriculture news in marathi, dam storage status, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 मे 2018
सांगली  ः जिल्ह्यातील पाच मध्यम व ७९ लघू प्रकल्पांची एकूण क्षमता ९४४०.२० दशलक्ष फूट असून या प्रकल्पांमध्ये सध्या १६७९.६२ दशलक्ष घनफूट म्हणजेच २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात सुमारे पाच टक्‍क्‍यांनी पाणी पातळीत घट झाली आहे. मिरज तालुक्‍यातील ३ तलावांत केवळ १६.५८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून उपयुक्त साठा शून्य टक्के आहे. यामुळे मिरज तालुक्‍यात भीषण टंचाई भासू लागली आहे. 
 
सांगली  ः जिल्ह्यातील पाच मध्यम व ७९ लघू प्रकल्पांची एकूण क्षमता ९४४०.२० दशलक्ष फूट असून या प्रकल्पांमध्ये सध्या १६७९.६२ दशलक्ष घनफूट म्हणजेच २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात सुमारे पाच टक्‍क्‍यांनी पाणी पातळीत घट झाली आहे. मिरज तालुक्‍यातील ३ तलावांत केवळ १६.५८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून उपयुक्त साठा शून्य टक्के आहे. यामुळे मिरज तालुक्‍यात भीषण टंचाई भासू लागली आहे. 
 
जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील ३ तलावांत गत महिन्यात १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मात्र, एका महिन्यात हा पाणीसाठा शून्य टक्‍क्‍यावर आला आहे. जत तालुक्‍यातील प्रकल्पांमध्ये २९ टक्के म्हणजे ८९६.५३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ तालुक्‍यांतील ३३ तलावांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. यामुळे या तालुक्‍यांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे.
 
तासगाव तालुक्‍यातील २, खानापूर तालुक्‍यातील १ आणि कवठेमहांकाळमधील १ आणि जत तालुक्‍यातील १ असे पाच तलाव कोरडे आहेत. तासगाव  तालुक्‍यातील सात तलावात केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या तालुक्‍यात पाणीटंचाई भासू लागली आहे.  

ताकारी, म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचन योजना सुरू आहेत. या योजनांचे पाणी तलाव भरून द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार पाटबंधारे विभागाने सहमती दर्शविली होती. मात्र, अद्यापही या योजनेतून जिल्ह्यातील तलाव भरून देण्यासाठी पाटबंधारे विभागाने कोणत्याही हालचाली सुरू केलेल्या दिसत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जरी आदेश दिले असले तरी पाटबंधारे विभागाने या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...