agriculture news in marathi, dam storage status in satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्‍क्‍यांवर उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

सातारा  : पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. धोम धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणांत ८० टक्‍क्‍यांवर उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

सातारा  : पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. धोम धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणांत ८० टक्‍क्‍यांवर उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम- बलकवडी ही प्रमुख धरणे आहेत. कोयना धरण हे वीजनिमिर्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या धरणाची पाणीपातळी नियंत्रित राहण्यासाठी धरण व्यवस्थापनाकडून दोनवेळा पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. इतर धरणांचीही हीच परिस्थिती झाली होती.
 
या सर्व धरणांतून पाणी सोडण्यात आले होते. वीजनिमिर्तीच्या महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात ९०.१५ टीएमसी म्हणजेच ९०.०३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍याच्या दृष्टीने उरमोडी धरण महत्त्वाचे आहे. या धरणात ९.१७ टीएमसी म्हणेजच ९५.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यामुळे एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाई कमी भासण्यास मदत होणार आहे; मात्र अजूनही या धरणाची कालव्याची कामे अपूर्ण असल्याने पाणी असून, शेतकरी पाण्यापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. धरण लाभक्षेत्रात असलेल्या शेतजमिनीस पाणी मिळावे, यासाठी कालव्याची कामे केली जावी अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
 
महू, हातेघर, नागेवाडी, उत्तरमांड, मोरणा, येरळवाडी या कमी क्षमता असलेल्या धरणात पाणीसाठा चांगला असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना हा पाणीसाठा फायदेशीर ठरणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...
पिवळी डेझी लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
निशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
वनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...
शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...
शेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे  ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...
शेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...
एक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...
तूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने...नगर  : मागील दहा वर्षांतील पाच ते सहा वर्षे...
शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचानागपूर  ः पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती...
संकटे असली तरी खचून न जाता पेरणी करणारपरभणी : औंदा मोसमी पाऊस वेळेवर यावा, समद्यांची...
राज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची...भारतीय भूखंडावरील हवेचा दाब कमी होत आहेत. अरबी...
साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या...
चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहणऔरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि...
हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा...अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...