agriculture news in marathi, dam storage status, satara, maharashtra | Agrowon

कोयना धरणात ३५.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018
सातारा  ः जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५.१३ टीएमसी पाणी जास्त असून, या धरणात गुरुवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंत ३५.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. राज्यातील वीजनिर्मितीच्या दृष्टीने हा साठा फायदेशीर ठरत आहे. 
 
सातारा  ः जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५.१३ टीएमसी पाणी जास्त असून, या धरणात गुरुवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंत ३५.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. राज्यातील वीजनिर्मितीच्या दृष्टीने हा साठा फायदेशीर ठरत आहे. 
 
जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने प्रमुख प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले. दमदार पावसाने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने प्रकल्प व्यवस्थापनास सर्वच धरणांतून पाणी सोडावे लागले होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या.
 
कोयना धरणाची एकूण क्षमता १०५.२५ टीएमसी असून, सध्या धरणात एकूण ४०.२२ टीएमसी तर ३५.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात सध्या ३५.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत या धरणात यंदा १५.१३ टीएमसी पाणी जास्त असल्याने वीजनिर्मितीस तसेच या नदीवर असलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठीदेखील पाणी मिळत आहे. 
 
धोम, कण्हेर व उरमोडी ही धरणे दुष्काळी तालुक्‍याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या तीनही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. यामध्ये उरमोडी धरणात सर्वाधिक ५७.९९, कण्हेरमध्ये ३२.१७ तर धोम धरणात २८.६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच तारळी धरणात २५.१३ तर धोम-बलकवडी धरणात १५.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...