agriculture news in marathi, dam storage status in varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायम
गोपाल हागे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017
अकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या संपूर्ण हंगामात वऱ्हाडात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम राहिली. कमी पावसाचा ताण आता संपूर्ण वर्षभर सहन करावा लागणार आहे. विशेषतः प्रकल्प भरले नसल्याने त्याचा पाणीटंचाई, तसेच रब्बीत होणाऱ्या सिंचनावरही परिणाम जाणवणार आहे.वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये अगदी बोटावर मोजण्याएवढे प्रकल्प तुडुंब भरले, तर बहुतांश प्रकल्प हे तहानलेलेच आहेत. 
 
अकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या संपूर्ण हंगामात वऱ्हाडात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम राहिली. कमी पावसाचा ताण आता संपूर्ण वर्षभर सहन करावा लागणार आहे. विशेषतः प्रकल्प भरले नसल्याने त्याचा पाणीटंचाई, तसेच रब्बीत होणाऱ्या सिंचनावरही परिणाम जाणवणार आहे.वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये अगदी बोटावर मोजण्याएवढे प्रकल्प तुडुंब भरले, तर बहुतांश प्रकल्प हे तहानलेलेच आहेत. 
 
अकोला जिल्ह्यातील वाण हा एकमेव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यात सध्या ९५ टक्‍क्‍यांवर साठा झालेला आहे. दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या काटेपूर्णात मात्र सुमारे २५ टक्केसुद्धा पाणीसाठा नाही. सध्या या प्रकल्पात अवघा २१ टक्के साठा झालेला असून, याच प्रकल्पावरून अकोला महानगरातील लाखो नागरिकांसह तालुक्‍यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. प्रकल्पातील स्थिती पाहता याआधीच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. प्रकल्पात पिण्यासाठीच वर्षभर पुरेल एवढे पाणी नसल्याने सिंचनाचा प्रश्‍नच या वर्षी उद्‌भवण्याची शक्‍यता नाही.
 
बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती थोडीशी ठीक आहे. या जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ४१ टक्के, पेनटाकळीमध्ये ४४, तर खडकपूर्णामध्ये २० टक्के जलसाठा आहे. वाशीम जिल्ह्यात मोठा प्रकल्प नसून, त्या ठिकाणी मध्यम व लघू प्रकल्प आहेत. अकोला जिल्ह्यात असलेल्या निर्गुणा या मध्यम प्रकल्पात ५८, मोर्णा प्रकल्पात १८, तर उमा प्रकल्पात ९.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाशीम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पातील साठा सध्या ३४ टक्‍क्‍यांपर्यंत पोचलेला आहे. दुसरा महत्त्वाचा असलेल्या एकबुर्जी प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठा झालेला आहे.
 
बुलडाणा जिल्ह्यात पलढग हा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्याशिवाय ज्ञानगंगात ५५, मस प्रकल्पात २८, कोराडी प्रकल्पात ३५, तोरणामध्ये ४०, तर उतावळी प्रकल्पात ३९ टक्के पाणीसाठा आहे. एकूणच उपरोक्त तीनही जिल्ह्यांतील प्रकल्पांची स्थिती बघितली, तर कमी पावसामुळे पाणी स्थिती चिंतनीय आहे. 
 
पावसाळ्यातील चारही महिन्यांत सलग व दमदार पाऊस न झाल्याने नदी-नाले फारसे वाहले नाहीत. याचा फटका प्रकल्पांना बसला. दरवर्षी भरणारे प्रकल्प या वर्षी रिकामे आहेत. जवळपास ९० टक्‍क्‍यांवर प्रकल्पांची स्थिती सारखी असल्याने चिंतेचा सूर उमटत आहे. किमान परतीच्या पावसाने ही कसर भरून काढली तर ठीक होईल. अन्यथा डिसेंबर-जानेवारीपासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. आधीच विहिरी, कूपनलिकांमधील पाणीपातळी सातत्याने कमी होत असून, आता विहिरींतील पंप टप्पे घेत आहेत.
 

इतर अॅग्रो विशेष
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...