agriculture news in marathi, Dam water level dips in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणांनी गाठला तळ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांनी तळ गाठला असून, सहा धरणे कोरडी पडली आहेत. सध्या जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांनी तळ गाठला असून, सहा धरणे कोरडी पडली आहेत. सध्या जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

पुणे जिल्ह्यात लहान-मोठी एकूण २४ धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी, तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अतिउष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत अवघा अठरा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा वेळेवर पाऊस न झाल्यास या धरणातील पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर, नाझरे, पिंपळगाव जोगे, घोड, विसापूर, टेमघर, वरसगाव ही धरणे कोरडी पडली असून, सहा धरणांत अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरित धरणात अल्प पाणीसाठा आहे. 

सध्या डिंभे धरणातून डाव्या कालव्याला सहाशे, घोड धरणातून वीस, तर वीर धरणातून ८२७ क्युसेसने विसर्ग सोडलेला आहे. वीर धरणातून उजव्या कालव्याला ११५१, खडकवासला धरणातून १४०१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान असून, काही भागांत पाऊस होत आहे. परंतु, धरणातील पाणीपातळी वाढविण्यासाठी जोरदार पावसाची गरज असून,  येत्या दहा ते पंधरा दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास ही धरणे पुन्हा भरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...