agriculture news in marathi, dam water storage level decrease, pune, maharashtra | Agrowon

राज्यात जलसंकट गडद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

पुणे  : मॉन्सूनने परतीच्या प्रवासात राज्यातील काही भागांतून माघार घेतली अाहे. यंदाचा पावसाळा संपतोय तोच राज्यातील धरणांमधील पाणीपातळी कमी होऊ लागली अाहे.

पुणे  : मॉन्सूनने परतीच्या प्रवासात राज्यातील काही भागांतून माघार घेतली अाहे. यंदाचा पावसाळा संपतोय तोच राज्यातील धरणांमधील पाणीपातळी कमी होऊ लागली अाहे.

गेल्या वर्षातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा खूपच कमी पाणीसाठा आहे. या वर्षी सध्या राज्यातील सर्व प्रकल्पांत मिळून अवघा ६५ टक्के पाणीसाठा आहे. सर्व प्रकल्पांत मिळून याच कालावधीत २०१६ मध्ये ८२, २०१७ मध्ये ७५ टक्के पाणीसाठा होता. मराठवाड्यातील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भर पावसाळ्यातच अनेक धरणांतील पाणीपातळी तळाशी गेली आहे.  
गुरुवारी (ता.४) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६६ प्रकल्पांमध्ये ९३६.६६ टीएमसी (६५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. १४ सप्टेंंबर रोजी राज्यात ९६१.०२ टीएमसी (६७ टक्के) पाणीसाठा होता.

पावसाळा सुरू असतानाही धरणांतील पाणीसाठा दोन टक्क्यांनी कमी झाला आहे. पुढील काळात पाण्याची मागणी वाढणार असून, उन्हाळ्यात लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. राज्यातील १४० मोठ्या प्रकल्पांमध्ये ७४७.४३ टीएमसी (७३ टक्के), मध्यम २५८ प्रकल्पांमध्ये १०२.०७ टीएमसी (५३ टक्के); तर २८६८ लहान प्रकल्पांमध्ये ८७.१७ टीएमसी (३९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद आहे.

मराठवाड्यात अत्यल्प पाणीसाठा
पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून, सर्व प्रकल्पामंध्ये मिळून ७१.१४ टीएमसी म्हणजेच अवघा २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणात अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून ५८.०४ टीएमसी (५७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील उर्वरित धरणांमधील पाणीसाठा स्थिती अत्यंत चिंताजनक असून माजलगाव, मांजरा (बीड), सीना कोळेगाव (उस्मानाबाद) या धरणांनी तळ गाठला अाहे. येलदरी धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ४८.२३ टीएमसी (३० टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ८.७६ टीएमसी (२३ टक्के); तर लहान ८३९ प्रकल्पांमध्ये १४.१६ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.
 

पुणे विभागात पाणीसाठा झाला कमी
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सर्वच प्रमुख धरणे यंदा ‘ओव्हरफ्लाे’ झाल्याने मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागला. सोलापुरातील उजनी धरण १०० टक्के भरले; तर कोयना धरण ओसंडून वाहिले. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने या सर्व धरणांमधील पाणी कमी होण्यास सुरवात झाली आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर आला असून, उजनीतील पाणी कमी होऊ लागले आहे. विभागातील सर्व ७२५ धरणांमध्ये मिळून सध्या ४३२.६२ टीएमसी (८१ टक्के) पाणीसाठा आहे. ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१०८.०४ टीएमसी (९३ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये ३०.१८ टीएमसी (६३ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये १४.८६ टीएमसी (३० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

नाशिक विभागात ६५ टक्के पाणी
नाशिक विभागातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ५७१ प्रकल्पांमध्ये १३५.९२ टीएमसी (६५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसाळ्याच्या सुरवातीलाच पावसाने ओढ दिल्याने नाशिक विभागात चिंता वाढली होती. मात्र नंतरच्या पावसाने काही प्रमाणात कसर भरून काढली. गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळंवडे धरणासह अनेक लहान-मोठ्या धरणांतून पाणी साेडण्यात आले. मात्र त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात पुरेशी वाढ होऊ शकली नाही. विभागातील मोठ्या २३ प्रकल्पांमध्ये १०१.३६ टीएमसी (७८ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १९.६६ टीएमसी (४७ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये १४.९० टीएमसी (३९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

कोकणात समाधानकारक स्थिती
सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ देऊनही पावसाळ्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने कोकणातील धरणांमध्ये सामधानकारक पाणी जमा झाले आहे. मात्र मुंबईसह शहरी भागाला पाणीपुरवठा करणारे सर्वच प्रकल्पांतील पाणीसाठा आता कमी हाेऊ लागला आहे. कोकणात सर्व १७६ धरणांमध्ये मिळून यंदा ११०.७५ टीएमसी (८९ टक्के) पाणीसाठा आहे. ठाण्यातील भातसा, पालघरमधील कवडास, धामनी, सिंधुदुर्गमधील तिलारी प्रकल्पात मुबलक पाणी आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून ७९.८६ टीएमसी (९२ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १५.५३ टीएमसी (९० टक्के); तर १५८ लघू प्रकल्पात १५.३६ टीएमसी (७७ टक्के) पाणीसाठा आहे.
 

नागपूर, अमरावती विभागात अपुरा पाणीसाठा
विदर्भात यंदा पावसाने सरासरी भरून काढली असली, तरी गतवर्षी धरणे कोरडीच राहिल्याने यंदा जेमतेम पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ४९ टक्के; तर अमरावती विभागात ५८ टक्के पाणी जमा झाले आहे. पूर्व विदर्भातील गोसी खुर्द (५० टक्के), कामठी खैरी (४५ टक्के), तातेलाडोह (२८ टक्के), इटियाडोह (५४ टक्के); तर पश्‍चिम विदर्भातील उर्ध्व वर्धा (५२ टक्के), इसापूर (६७ टक्के); तर बेंबळा धरणामध्ये (६१ टक्के) यंदा पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. नागपूर विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ७९.७२ टीएमसी (४९ टक्के); तर अमरावती विभागात ८५.९७ टीएमसी (५८ टक्के) पाणी उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात अाले.
 

राज्यातील मोठे, मध्यम, लघुपाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)
विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी
अमरावती ४४५  १४८.०० ८५.९७  ५८
कोकण १७६  १२३.९२ ११०.७५ ८९
नागपूर  ३८४ १६२.६५  ७९.७२ ४९
नाशिक ५७० २०९.५० १३५.९२ ६५
पुणे ७२६  ५३७.०१ ४५३.०९  ८४
मराठवाडा  ९६५ २६०.३४ ७१.१४ २७
एकूण   ३२६६ १४४१.४१ ९३६.६६ ६५

 

धरणातील पाणीसाठ्याची मागील तीन वर्षांची ४ ऑक्टोबरपर्यंतची तुलनात्मक स्थिती (टक्केवारी)
विभाग  २०१६ २०१७  २०१८
अमरावती  ७४ ३७  ५८
कोकण ९५ ९५  ८९
नागपूर ७० ४८ ४९
नाशिक ८३ ८२  ६५
पुणे  ८८ ८९  ८४
मराठवाडा ७१ ६६ २७

 

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...