agriculture news in marathi, dam water storage level, jalgaon, maharashtra | Agrowon

हतनूर धरणात ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 जून 2018

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांपैकी असलेल्या हतनूर धरणात फक्‍त ५ टक्के उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे या धरणावर पिण्याच्या पाण्यासह इतर वापरासाठी अवलंबून असलेल्या गावांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. 

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांपैकी असलेल्या हतनूर धरणात फक्‍त ५ टक्के उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे या धरणावर पिण्याच्या पाण्यासह इतर वापरासाठी अवलंबून असलेल्या गावांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. 

या धरणात गाळ अधिक जमा झाला आहे. त्यामुळे अलीकडच्या तीन ते चार वर्षांत मार्चमध्येच पाणीसाठा १८ ते २० टक्‍क्‍यांवर येतो. या धरणातून सुमारे २० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच भुसावळ शहर, दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र, जळगाव येथील औद्योगिक वसाहतीतही या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. साठा कमी होत असल्याने उन्हाळी पिकांना पाणी देता येणार नाही, हे निश्‍चित आहे.

पुढील आठ ते १० दिवसांत साठा आणखी कमी होईल. धरणाचे बॅकवॉटरही कमी झाले आहे. धरणातून गाळ काढण्याची मागणी आता पुढे येत असून, त्यासाठी शासन व मोठ्या संस्थांनी पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे. अजून पावसाला सुरवात झालेली नाही. धरण लवकर भरते, परंतु त्यातून पाण्याचा वापरही अधिक केला जातो.

चोपडा, यावल, रावेर या तालुक्‍यांतील शेतीला या धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. यंदा रब्बीचे आवर्तन सोडले होते. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठीच अधिक वापर झाला आहे. यातच जळगाव व भुसावळ तालुक्‍यातील तापी नदीकाठच्या गावांमधील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून हतनूरचे पाणी नदीत सोडण्याची मागणी ग्रामस्थ व सरपंचांनी प्रशासनाकडे केली आहे. धरणात पाणी कमी असल्याने ही मागणी मान्य झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...