agriculture news in marathi, dam water storage status, marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत ७.७९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत केवळ ७.७९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत केवळ १४.३७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याने मराठवाड्यातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

मराठवाड्यातील एकूण ८६७ लघु प्रकल्पांत १५.२७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत १७.७०, गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांत १८.७४ तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांत १२.४२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ १ टक्‍का उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत केवळ ७.७९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत केवळ १४.३७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याने मराठवाड्यातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

मराठवाड्यातील एकूण ८६७ लघु प्रकल्पांत १५.२७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत १७.७०, गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांत १८.७४ तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांत १२.४२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ १ टक्‍का उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पात १३, बीड जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत २३, लातूर जिल्ह्यातील ८ प्रकल्पांत १२, उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ प्रकल्पांत २२, नांदेड जिल्ह्यातील ९ प्रकल्पांत १९, परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पांत केवळ  ६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघुप्रकल्पांत ६, जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पांत ५, बीड जिल्ह्यातील १२६ प्रकल्पांत ८, लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पांत ९, उस्मानाबाद जिल्ह्यातील २०१ प्रकल्पांत ९, नांदेड जिल्ह्यातील ८८ प्रकल्पांत ९, परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पांत ६ तर हिंगोली जिल्ह्यातील २७ लघुप्रकल्पांत केवळ २ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी १८ मेपर्यंत मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत १२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिध्देश्‍वर, उर्ध्व पेनगंगा या तीन मोठ्या प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. शिवाय निम्न मनार प्रकल्पात ४  तर सिना कोळेगाव प्रकल्पात केवळ ९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाड्यातील एकूण ७६ मध्यम प्रकल्पांपैकी २४ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १३, जालना, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांतील प्रत्येकी १, बीड जिल्ह्यातील ४, लातूर व नांदेड जिल्ह्यांतील प्रत्येकी २ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील गोदावरी, मांजरा, रेणा, तेरणा या चार नद्यांवर ३५ बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या ३५ बंधाऱ्यांपैकी १० बंधाऱ्यांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामध्ये गोदावरी नदीवरील १ व तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील ९ बंधाऱ्यांचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...