agriculture news in marathi, dam water storage status, nagpur, maharashtra | Agrowon

नागपूर विभागातील प्रकल्पात  उरला १० टक्‍के जलसाठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

नागपूर  : विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघा १० टक्‍के साठा उरल्याने येत्या काळात भीषण पाणीसंकटाचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. विभागात १८ मोठे प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील १९ गावांत सध्या टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

कमी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व पेंच नवेगाव खैरी या दोन्ही प्रकल्पांमध्ये फक्‍त ६७.४४२ दलघमी इतका पाणीसाठा उरला आहे. पिण्याच्या पाण्यासह रोज १.३० दलघमी पाणी वापर असल्यामुळे दहा जूनपर्यंतच पुरेल इतकेच पाणी या प्रकल्पात आहे. परिणामी मॉन्सून लांबल्यास नागपूरकरांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार आहे.

नागपूर  : विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघा १० टक्‍के साठा उरल्याने येत्या काळात भीषण पाणीसंकटाचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. विभागात १८ मोठे प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील १९ गावांत सध्या टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

कमी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व पेंच नवेगाव खैरी या दोन्ही प्रकल्पांमध्ये फक्‍त ६७.४४२ दलघमी इतका पाणीसाठा उरला आहे. पिण्याच्या पाण्यासह रोज १.३० दलघमी पाणी वापर असल्यामुळे दहा जूनपर्यंतच पुरेल इतकेच पाणी या प्रकल्पात आहे. परिणामी मॉन्सून लांबल्यास नागपूरकरांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार आहे.

नागपूर विभागातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या तोतलाडोह प्रकल्पाची एकूण क्षमता १०१६.९ दलघमी आहे. यात केवळ २२ दलघमी म्हणजेच केवळ दोन टक्‍के पाणीसाठा उरला आहे. गोसे खुर्द प्रकल्प टप्पा दोनची क्षमता ७४० इतकी आहे. हा प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे. वडगाव धरणात केवळ १ टक्‍के पाणी आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पही कोरडा पडला आहे. त्यामुळे पाणीसंकट अधिक गडद झाले आहे. गेल्या वर्षी नागपूर जिल्ह्यात ३५ गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. यावर्षी आतापासूनच १९ गावांमध्ये टॅंकरची सेवा सुरू झाली आहे. नागपूर जिल्ह्यात ४९० गावांमध्ये ८१२ बोअरवेल तयार करण्याचे प्रस्तावित होते. परंतू कंत्राटदारांचे सहकार्य न मिळाल्यामुळे ही कामे सुुरू होण्यास विलंब झाला. 

१९ गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा
शहरालगतच्या गावांना पाणीटंचाईची झळ बसत असून आतापर्यंत १९ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये बिडगाव, लावा, सुराबर्डी, बोथली, खापा, निपाणी, मोहगाव ढोले, गिदमगड, गोठणगाव, सुकळी कलार, वलनी, मौराळा, सीताखैरी, नीलडोह, कवडस, तांडा, खापरी रेल्वे, मोटाड, पांजरी, पिंडकापार, व्याहाड या गावांचा समावेश आहे. २४ टॅंकरने येथे पुरवठा होते. नीलडोह येथे सर्वाधिक ७८ फेऱ्या होत आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...