agriculture news in marathi, dam water storage status, nashik, maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील धरणांत २० टक्के उपयुक्त पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 मे 2018

नाशिक  : जिल्ह्यातील सर्व १०३ प्रकल्पांत २०१७ च्या तुलनेत यंदाच्या मे महिन्याच्या अखेरीस पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र जिल्ह्यात २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, तर विभागातील ३५३ प्रकल्पांत २०.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

नाशिक  : जिल्ह्यातील सर्व १०३ प्रकल्पांत २०१७ च्या तुलनेत यंदाच्या मे महिन्याच्या अखेरीस पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र जिल्ह्यात २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, तर विभागातील ३५३ प्रकल्पांत २०.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील मध्यम, लघू आणि मोठ्या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दलघफू इतकी आहे. त्यापैकी सध्या १३ हजार ४८९ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी १० हजार १२० दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक होता. परिणामी, पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीकपातीचे सावट दूर झाले आहे.

जिल्ह्यातील सात मोठ्या प्रकल्पांपैकी गंगापूर, करंजवण, दारणा, मुकणे आणि कडवा या पाच प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. चणकापूर आणि गिरणा या दोन मोठ्या प्रकल्पांत मात्र गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्यापेक्षा यंदा कमी पाणीसाठा आहे. आळंदी, पुणेगाव, भावली, वालदेवी आणि नागासाक्‍या हे पाच प्रकल्प गेल्या वर्षी कोरडे पडले होते.

यंदा मात्र या प्रकल्पांत काही प्रमाणात पाणी आहे, तर भोजापूर आणि माणिकपुंज हे दोन्ही प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही कोरडेठाक पडलेले आहेत. मॉन्सूनचे आगमन वेळेवर झाल्यास पाणीटंचाईचे संकट ओढवणार नाही. मात्र, मॉन्सूनचे आगमन लांबल्यास पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...