जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
अॅग्रो विशेष
सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर जुलैमध्ये तीन एकरांतील द्राक्षाची फळ छाटणी घेतली हुती. द्राक्षांनी बाग बहरली हुती. सुमारे ८ ते ९ हजार द्राक्षाच्या पेट्यांचे उत्पादन होईल असा अंदाज हुता. द्राक्ष विक्रीसाठी ४०५ रुपये प्रतिपेटी (चार किलोची पेटी) असा दर ठरवला हुता. व्यापारी द्राक्ष काढणीसाठी सोमवारी (ता. १९) येणार हुतं... पण अचानक रविवारी (ता. १८) रातीपासून वादळासह पावसाला सुरवात झाली अन् हुत्याचं नव्हत झालं. अंदाजे ३५ ते ३७ लाख रुयपांच नुकसान झालया. असं आटपाडी (जि. सांगली) येथील द्राक्ष उत्पादक रामकृष्ण नानासाहेब देशमुख हताश होऊन सांगत होते.

माझी दहा एकर द्राक्षाची बाग हाय. तालुक्यात पाणीटंचाईमुळं टॅंकरद्वारे बागा जगविल्या. दोन पैकं मिळतील म्हणून त्यापैकी तीन एकरांतील बागेची २९ जुलैला फळछाटणी घेतली हुती. पाणीटंचाईवर मात करून बाग चांगली आणली हुती. बागेवर कुठलाही रोग नव्हता. रसाळ द्राक्ष तयार झाली हुती. तीन एकराला सुमारे १० ते ११ लाख रुपये खर्च केला हुता. द्राक्षाची विक्री करायची हुती. त्यासाठी व्यापारी देखील बांधावर येऊन गेला हुता.
द्राक्षाला ४०५ रुपये असा दर ठरविला. दर चांगला मिळाला. व्यापारी म्हणाला, सोमवारी येऊन द्राक्षाची काढणी करूया. त्यानुसार द्राक्ष काढण्यासाठी मजुरांचे नियोजन केले. काढलेली द्राक्ष भरण्यासाठी टेेंपोदेखील शेतात आला हुता. दोन पैकं अधिक मिळणार म्हणून शेतीच्या पाण्यासाठी पाइपलाइन करायची ठरवलं हुतं. त्यामुळं चिंता लागली हुती. पण रविवारी रात्री पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यानं थेट बागेत गेलो, बागेत पाणी साचलं हुतं. द्राक्ष तडकली हुती. वादळी पावसानं हुत्याचं नव्हतं झालं होतं.
द्राक्षाचे नुकसान झाले तरी दोन मिळावेत, यासाठी द्राक्षाची विमा भरला आहे. मात्र, या पिकासाठी निकष ऑक्टोबरपासून धरला जातो. तो बदलून जुलै-ऑगस्ट करावे. म्हणजे आम्हाला याचा फायदा हाईल.
- रामकृष्ण देशमुख, द्राक्ष उत्पादक शेतकरी, आटपाडी
- 1 of 288
- ››