agriculture news in marathi, Dapoli VC Dr. Tapas Bhattacharya resigns | Agrowon

कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

दापोली, जि. रत्नागिरी : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी कुलगुरू पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शुक्रवारी (ता.१) सकाळी डॉ. भट्टाचार्य यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा फॅक्‍स केला. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा दिला आहे. तातडीने राजीनामा दिला असला तरी ऑगस्टपर्यंत या पदावर कायम रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, डॉ. भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

दापोली, जि. रत्नागिरी : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी कुलगुरू पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शुक्रवारी (ता.१) सकाळी डॉ. भट्टाचार्य यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा फॅक्‍स केला. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा दिला आहे. तातडीने राजीनामा दिला असला तरी ऑगस्टपर्यंत या पदावर कायम रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, डॉ. भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

६ नोव्हेंबर २०१५ ला त्यांनी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. मुळचे पश्‍चिम बंगालचे असणारे डॉ. भट्टाचार्य यांची बहुतांशी सेवा महाराष्ट्रात झाली आहे. ते कुलगुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करत होते. तेथून त्यांची कुलगुरू म्हणून निवड झाली. त्यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल २०२० पर्यंत होता.

विद्यापीठाने नुकतीच जॉइंट ॲग्रेस्को परिषद घेतली. या परिषदेचे नियोजन झाल्यानंतर येत्या दहा तारखेला विद्यापीठात पाणी व्यवस्थापनावर राष्ट्रीय कार्यशाळा होणार होती. याच्या नियोजनाची कार्यवाही सुरू असताना त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिला असला तरी ते ऑगस्टपर्यंत असणार असल्याने नियोजित कार्यक्रमावर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. राजीनाम्यासाठी कोणतेही कारण चर्चेत नसताना त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने नेमक्‍या कारणाबाबत विद्यापीठ परिसरात तर्कवितर्क सुरू होते.

इतर अॅग्रो विशेष
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...
मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...
देशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...
फुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...