agriculture news in marathi, Datta kale developes new Grape Variety Danaka, Solapur, maharashtra | Agrowon

कृषिभूषण काळे यांनी विकसित केले ‘दनाका' द्राक्ष वाण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

सोलापूर : राज्यभरातील द्राक्ष क्षेत्रात शरद, सोनाका, नानासाहेब पर्पल, सरिता सीडलेस यांसारख्या निवड पद्धतीने (सिलेक्शन) विविध वाणांची मालिका देणाऱ्या नान्नज येथील काळे कुटुंबीयांतील कृषिभूषण दत्ता काळे यांनी आता याच श्रेणीतील दनाका सीडलेस (दत्तात्रय नानासाहेब काळे) या नावाने आणखी एक द्राक्ष वाण विकसित केले आहे. काळे कुटुंबीयांनी विकसित केलेले हे पाचवे वाण आहे. या वाणाचे पहिले उत्पादन काळे यांनी यंदाच्या मार्चमध्ये एकरी १२ टन याप्रमाणे घेतले आहे. 

सोलापूर : राज्यभरातील द्राक्ष क्षेत्रात शरद, सोनाका, नानासाहेब पर्पल, सरिता सीडलेस यांसारख्या निवड पद्धतीने (सिलेक्शन) विविध वाणांची मालिका देणाऱ्या नान्नज येथील काळे कुटुंबीयांतील कृषिभूषण दत्ता काळे यांनी आता याच श्रेणीतील दनाका सीडलेस (दत्तात्रय नानासाहेब काळे) या नावाने आणखी एक द्राक्ष वाण विकसित केले आहे. काळे कुटुंबीयांनी विकसित केलेले हे पाचवे वाण आहे. या वाणाचे पहिले उत्पादन काळे यांनी यंदाच्या मार्चमध्ये एकरी १२ टन याप्रमाणे घेतले आहे. 

कृषिभूषण दत्तात्रय काळे यांचे नाव द्राक्ष क्षेत्रामध्ये सर्वपरिचित आहे. काळे यांचे वडील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक (कै.) नानासाहेब यांनी विकसित केलेल्या सोनाका, शरद सीडलेस नंतर दत्तात्रय यांनीही सरिता, नानासाहेब पर्पल यासारखी वाणे विकसित केली. अभ्यास आणि निरीक्षणशक्तीतून दत्तात्रय यांनीही आता पुन्हा एकदा द्राक्षाच्या दनाका या वाणाचे संशोधन केले आहे. गुणवत्ता, चव, आकार, रंग या सगळ्याच पातळीवर त्यांच्या या नव्या वाणाने अल्पावधीतच द्राक्ष उत्पादकांच्या मनात स्थान मिळवले आहे. 

अशी आहेत वैशिष्ट्ये 

  • मण्याची लांबी दीड इंच
  • देठाजवळ मजबुती असल्याने फ्लॉवरिंगमध्ये गळ होत नाही 
  • द्राक्षमणी देठापासून ओढला तरी सुटत नाही
  • द्राक्षमण्याची जाडी १७ ते १८ मिमीपर्यंत होते
  • मणी सेटिंग झालेला घड हात लावला असता मणी घट्ट चिकटलेले जाणवतात 
  • मण्याचा रंग दुधी येतो
  • द्राक्षमण्याला गर भरपूर असल्याने मण्यांची चव कुरकुरीत लागते
  • देठाला मणी जिथे लगललेला असतो त्याच्या आत म्हणजेच ब्रश अर्धा इंचापेक्षा जास्त असल्यामुळे त्याला मजबूती येऊन मणीगळ होत नाही
  • गोडी छाटणीनंतर वाण १२० दिवसांत तयार होते.

द्राक्षकाड्या, घडातील वेगळेपणातून काही अभ्यासू शेतकरी असे द्राक्षवाण विकसित करतात, आमच्याकडेही त्या काड्या निरीक्षणासाठी येतात. आम्हीही त्यावर काम करतो. मुख्यतः अभ्यास आणि निरीक्षणशक्ती त्यासाठी महत्त्वाची आहे. 
- डॉ. एस. डी. सावंत, केंद्र संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

 आतापर्यंत आमच्या सगळ्याच वाणांविषयी द्राक्ष उत्पादकांमध्ये विश्‍वासार्हता आहे. याही वाणाला मागणी वाढेल, असा विश्‍वास आहे. निर्यातीसाठीहीसुद्धा तो चालेल. यंदाच्या मार्चमध्ये त्याचे पहिले उत्पादन एकरी १२ टनांप्रमाणे मला मिळाले आहेत. शेतकऱ्यांना या वाणाच्या काड्या देत आहे. 
- कृषिभूषण दत्तात्रय काळे, नान्नज, ता. उत्तर सोलापूर

इतर अॅग्रो विशेष
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...