agriculture news in marathi, Daund taluka leads the sugarcane cultivation | Agrowon

ऊस लागवडीत दौंड तालुका आघाडीवर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

पुणे : शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणाऱ्या सुरू उसाच्या लागवडीस पुणे जिल्ह्यात सुरवात झाली आहे. जिल्ह्यात आडसाली, पूर्वहंगामी उसाच्या लागवडी पूर्ण झाल्या असून आतापर्यंत एकूण ६६ हजार ९९० हेक्टरवर लागवड झाली. यात दौंड तालुक्याने आघाडी घेत तब्बल १३ हजार ५४० हेक्टरवर या तालुक्यात लागवड झाली आहे.

पुणे : शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणाऱ्या सुरू उसाच्या लागवडीस पुणे जिल्ह्यात सुरवात झाली आहे. जिल्ह्यात आडसाली, पूर्वहंगामी उसाच्या लागवडी पूर्ण झाल्या असून आतापर्यंत एकूण ६६ हजार ९९० हेक्टरवर लागवड झाली. यात दौंड तालुक्याने आघाडी घेत तब्बल १३ हजार ५४० हेक्टरवर या तालुक्यात लागवड झाली आहे.

पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग हा कमी पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो, परंतु पश्चिमेकडील होत असलेल्या अधिक पावसामुळे धरणातील पाणी कॅनालद्वारे या भागात दिले जाते. त्यामुळे पिकांची निश्चित हमी देणारे पीक म्हणून दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर या तालुक्यातील अनेक शेतकरी उसाचे पिके घेतात. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून साखर कारखानदारी जोमात सुरू आहे.

दरवर्षी शेतकरी आडसाली उसाची लागवड जुलै ते ऑगस्ट या कालावधीत करतात. पूर्वहंगामी उसाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेबर या कालावधीत करतात, तर सुरू उसाची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात करतात. साधारणपणे ऊस पक्व होईतोपर्यंत १० ते १२ महिन्याचा कालावधी लागत असून त्यानंतर त्याची तोडणी केली जाते. जिल्ह्यात उसाचे एकूण सरासरी एक लाख ३० हजार ६३० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आडसाली उसाची ४६ हजार ५४० हेक्टर, पूर्वहंगामी उसाची १९ हजार १९० हेक्टरवर लागवड झाली आहे. सुरू उसाची आतापर्यंत एक हजार २५० हेक्टरवर लागवड झाली आहे.

जिल्ह्यात मुळशी, वेल्हे हे तालुके ऊस लागवडीपासून दूर असले तरी भोर, मावळ तालुक्यात बोटावर मोजण्याएवढीच लागवड झाली आहे. पूर्वेकडील तालुक्यात दौड नंतर इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या आहेत.
जिल्ह्यात आडसाली उसाची सर्वाधिक लागवड इंदापूर तालुक्यात झाली आहे. सुमारे दहा हजार ७०० हेक्टरवर लागवड झाली आहे.

दौड तालुक्यात सात हजार ७४० हेक्टरवर लागवड झाली आहे. शिरूरमध्ये सहा हजार ८८० हेक्टरवर लागवड झाली असून मुळशी, वेल्हे तालुक्यात आडसाली उसापासून दूर राहिले आहेत. पूर्व हंगामी उसाच्या लागवडीत दौड तालुक्याने आघाडी घेत तब्बल चार हजार ७७० हेक्टरवर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. त्यानंतर शिरूर तालुक्यात तीन हजार ७५० हेक्टरवर लागवड झाली आहे.

तालुकानिहाय उसाची लागवड (हेक्टरमध्ये)
हवेली ३९८०, भोर ३३०, मावळ ५६०, जुन्नर ५९८०, खेड २२७०, आंबेगाव ३४८०, शिरूर १०,६३०, बारामती ११,८१०, इंदापूर १२,०९०,
दौंड १३,५४०, पुरंदर २३२०.

 

इतर बातम्या
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय...कॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो....
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
साताऱ्यात मेथी, कोथिंबिरीला प्रतिशेकडा...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी...सोलापूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईवर मात...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
मराठवाड्यातील लघू, मध्यम प्रकल्पांतील...औरंगाबाद  : दुष्काळाच्या उंबरठ्यावरील...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
शास्वत उत्पन्नासाठी रेशीम उद्योग समजून...औरंगाबाद : शाश्वत उत्पादन व उत्पन्नासाठी नव्याने...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...