साहेबांच्या देशातील एक आनंदयात्री पुण्यात...

ॲटाव्ह
ॲटाव्ह

पर्यावरण संरक्षण आणि शाश्‍वत शेतीचा प्रसारहेतू साहेबांच्या देशातील एक आनंदयात्री सध्या आपल्या देशात पदभ्रमंती करत आहे. इंग्लंडचा रहिवासी असलेला डेव्हिड ॲटाव्ह हा युवक कन्याकुमारी ते पंजाब असा सहा हजार किलोमीटरचा पायी प्रवास करतोय. सध्या तो पुणे मुक्कामी असून पुणे परिसरातील शाश्‍वत शेती, निसर्ग शेती, सेंद्रिय शेतीसह संशोधन संस्थांनाही भेटी दिल्या. अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांकरिता मदतनिधीचीही निर्मिती तो करतोय.  ‘वॉक आॅफ जॉय’ (आनंदयात्रा) अशी त्याच्या भारतातील प्रवासाची संकल्पना असून देशातील १६ राज्यांतून तो प्रवास करणार आहे. पर्यावरणावर अत्यंत प्रेम करणाऱ्या या अवलियाला जंगल भ्रमंती अाणि गिरीभ्रमण करण्यास अावडते. मी निसर्गापासून खूप धडे शिकलो आहे. आयुष्य हेच मुळात बदल घडवत असते. आपण या बदलाविरोधात एकतर संघर्ष करत वेळ घालवू शकतो, अन्यथा सहजरित्या त्यास प्रवाही करू शकतो. ज्या दिवशी मला कळाले, की आपला जन्म हा प्रवासी अाहे, माझे आयुष्य पुढे सरकण्यास प्रारंभ झाला, असे मत डेव्हिडने व्यक्त केले आहे.  २०१४ मध्ये इंडोनेशिया त्याच्या प्रवास संकल्पनेने जन्म झाला. आत्तापर्यंत मलेशिया, ब्रुनाई देशात ३६०० किलोमीटर डेव्हिड याने प्रवास केला अाहे. जगभरात आनंदी जगण्याचा संदेश घेऊन नोमॅडीक लायन या संकल्पनेवर आधारीत विविध देशांतील प्रवास तो करत अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com