agriculture news in marathi, DBT for crop insurance will favour farmer | Agrowon

पीकविमा भरपाईसाठीही डीबीटी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पुणे : खरीप पीकविमा भरपाईच्या रकमा थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा कराव्यात, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे दाबून धरणाऱ्या काही बॅंकांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

राज्यात खरिपात ८१ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. भरपाई केव्हा मिळेल, अशी विचारणा शेतकरी करत आहेत. नेहमीची पद्धत बघता विमा कंपन्या नुकसानभरपाईचा आकडा प्रथम निश्चित करतात. राज्य शासनाकडून भरपाईचा हिस्सा मिळाल्यानंतर भरपाईची एकूण रक्कम विमा कंपन्यांकडून बँकांना दिली जाते; मात्र बॅंका ही रक्कम लगेच शेतकऱ्यांना देत नाहीत.

पुणे : खरीप पीकविमा भरपाईच्या रकमा थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा कराव्यात, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे दाबून धरणाऱ्या काही बॅंकांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

राज्यात खरिपात ८१ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. भरपाई केव्हा मिळेल, अशी विचारणा शेतकरी करत आहेत. नेहमीची पद्धत बघता विमा कंपन्या नुकसानभरपाईचा आकडा प्रथम निश्चित करतात. राज्य शासनाकडून भरपाईचा हिस्सा मिळाल्यानंतर भरपाईची एकूण रक्कम विमा कंपन्यांकडून बँकांना दिली जाते; मात्र बॅंका ही रक्कम लगेच शेतकऱ्यांना देत नाहीत.

'पीकविमा नुकसानभरपाईपोटी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा काही बॅंका वापरतात, असा संशय आहे. काही बॅंका अनेक दिवस या रकमा देत नाही तर काही ठिकाणी एजंटगिरी चालते. यामुळे शेतकरी नाराज होतात. बॅंकांच्या कुचराईमुळे चांगल्या काम करणाऱ्या इतर बॅंकांचीदेखील अकारण कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी आता डीबीटी प्रणालीचा वापर हाच उत्तम पर्याय आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

"बॅंकांकडून पीकविमा भरपाईच्या रकमा परस्पर अडवून ठेवल्या जातात. विमा कंपन्यांची बैठक घेऊन आता विमा भरपाईचे दावे सोडविताना डीबीटीचा वापर करावा, अशा सूचना कृषी खात्याने दिलेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात एका मंडळात अडीच कोटी रुपयांची पीकविमा भरपाई डीबीटी पद्धतीने देण्याची तयारी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने केली आहे. याच आठवड्यात डीबीटीचा वापर गोंदियात होण्याची शक्यता आहे, असे कृषी खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

ओरिएन्ट इन्शुरन्स कंपनीलादेखील भंडारा जिल्ह्यातील ११ मंडळामधील शेतकऱ्यांना पीकविमा भरपाईपोटी रकमा जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. "भंडारा जिल्ह्यातील या मंडळांमध्ये किमान १८ कोटी रुपयांचे वाटप डीबीटीने होण्यासाठी कृषी खाते प्रयत्नशील आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

मूग व उडीड उत्पादकांना ५०० कोटी मिळण्याची शक्यता
राज्यातील मूग व उडीद उत्पादकांना पीकविम्याच्या भरपाईपोटी ५०० कोटी रुपये वाटले जाण्याची चिन्हे आहेत. विमा कंपन्यांना मूग, उडीद, सोयाबीन व धानाच्या पीककापणी प्रयोगाची माहिती कृषी खात्याकडून पुरवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता डीबीटी पद्धतीने विमा कंपन्यांनी नुकसानभरपाईच्या रक्कमा वाटण्याची प्रक्रिया सुरू करावी, असा आग्रह कृषी खात्याने विमा कंपन्यांकडे धरला आहे.

इतर अॅग्रो विशेष
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...
एकात्मिक शेतीचा गाडा कुठे अडला?पावसाच्या पाण्यावरील जिरायती शेती, शेतीपूरक...
बळी ः अफवांचे अन्‌ अनास्थेचेहीधुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात राईनपाडा...
मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटपऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
बोंड अळी, तुडतुड्यामुळे नुकसानग्रस्त...नागपूर : बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे...
दुध आंदोलनाची धग कायमपुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ...
दूध प्रश्नावर दिल्लीत विविध उपायांची...नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा...
जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा...नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार...
पावसामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचे...पुणे: राज्याच्या काही भागात संततधार सुरू...
नद्या- नाले तुडुंब, धरणे ‘आेव्हरफ्लो’पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे...
वैविध्यतेने नटलेली १३ एकरांवरील...लातूर जिल्ह्यातील अजनसोंडा (बु.) (ता. चाकूर)...
वीस गुंठ्यांत ‘एक्साॅटीक' भाजीपाला...जालना जिल्ह्यातील साष्टे पिंपळगाव येथील...