agriculture news in marathi, 'The death of those farmers, due to addiction and sickness' | Agrowon

‘त्या शेतकऱ्यांचे मृत्यू व्यसनाधीनता, आजारपणामुळे’
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मृत्यू हे कीटकनाशकांमुळे झाल्याचा आरोप सपशेल खोटा आहे. या मृत्यूंमागे व्यसनाधीनता आणि आजारपण अशी कारणे आहेत, असा दावा क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाचे (सीसीएफआय) अध्यक्ष राजू श्रॉफ यांनी शुक्रवारी (ता. 10) केला. या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी हस्तलिखित वैद्यकीय रिपोर्ट पत्रकार परिषदेत दाखविले.

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मृत्यू हे कीटकनाशकांमुळे झाल्याचा आरोप सपशेल खोटा आहे. या मृत्यूंमागे व्यसनाधीनता आणि आजारपण अशी कारणे आहेत, असा दावा क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाचे (सीसीएफआय) अध्यक्ष राजू श्रॉफ यांनी शुक्रवारी (ता. 10) केला. या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी हस्तलिखित वैद्यकीय रिपोर्ट पत्रकार परिषदेत दाखविले.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान 22 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, 400 पेक्षा अधिक बाधित झाले होते. कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, शिफारस नसतानादेखील काही घटकांचे मिश्रण करून फवारणी, फवारणीच्या वेळी सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष अशी अनेक कारणे प्राथमिक चौकशीत समोर आली होती. क्रॉप केअर फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी (ता. 10) अध्यक्ष राजू श्रॉफ, तसेच उपाध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी कीटकनाशकांना याप्रकरणी दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे सांगितले.

श्रॉफ म्हणाले, की 99 टक्‍के पाण्यात रसायन मिसळले जाते, त्यामुळे कीटकनाशकांमुळे व्यक्‍ती मरते हे कोणी सिद्ध केले, तर आपण त्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस देऊ. काही शेतकऱ्यांच्या मृत्यूसंदर्भाने वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालात अल्कोहोलिक टॉक्‍सिक असे नमूद आहे, त्यामुळे दारू हेदेखील एक कारण मृत्यूमागे असू शकते. यवतमाळचे स्थानिक प्रशासनदेखील तसे खासगीत सांगते; परंतु दबाव असल्याने त्यांच्याकडून या संदर्भाने अधिकृत माहिती देण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. केंद्रीय कृषी सचिव एस. के. पटनायक यांनादेखील अनेक अहवाल यवतमाळच्या घटनेवर प्राप्त झाले आहेत. या एकाही अहवालात कीटकनाशकामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, असा उल्लेख नाही. खुद्द पटनायक यांनी त्यांच्या भेटीत आम्हाला हे सांगितले आहे.

"एसआयटी'मध्ये सीसीएफआयचे प्रतिनिधी?
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनादेखील शेतकरी मृत्यूबाबतची सत्य परिस्थिती कळविण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी मध्ये क्रॉप केअर फेडरेशनचे प्रतिनिधी असावेत, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस याबाबत सकारात्मक असून, आमचे दोन प्रतिनिधी समितीवर घेण्याचे त्यांनी मान्य केले. लवकरच यावर निर्णय होईल, असे श्री. श्रॉफ यांनी सांगितले.

 

इतर अॅग्रो विशेष
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...