agriculture news in marathi, Debt waiver increased | Agrowon

कर्जमाफीसंबंधीच्या याद्यांचा गोंधळ वाढला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

जळगाव  ः जिल्ह्यात कर्जमाफीसंबंधीच्या याद्या बॅंकांमध्ये उपलब्ध नाहीत. बॅंकांनी मात्र आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला नसेल, तर संपर्क साधण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. शेतकरी याद्या पाहण्यासाठी गेले, तर त्यांना कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे चित्र आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्याची अंतिम ३१ मार्चची मुदत जवळ येत आहे, तरीही हा गोंधळ कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

जळगाव  ः जिल्ह्यात कर्जमाफीसंबंधीच्या याद्या बॅंकांमध्ये उपलब्ध नाहीत. बॅंकांनी मात्र आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला नसेल, तर संपर्क साधण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. शेतकरी याद्या पाहण्यासाठी गेले, तर त्यांना कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे चित्र आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्याची अंतिम ३१ मार्चची मुदत जवळ येत आहे, तरीही हा गोंधळ कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

कर्जमाफीच्या प्रक्रियेत सावळा गोंधळ सुरूच असल्याने शेतकऱ्यांना हकनाक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा बॅंकेकडून २५ टक्के सवलतीसंबंधीचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही. या संदर्भात शेतकरी बॅंकेत विचारणा करायला गेल्यास त्यांना आम्ही माहिती अपलोड केली आहे. शासनच निर्णय घेईल, याद्या शासनच पाठवित आहे, असे सांगितले जाते. परंतु जी माहिती बॅंकेने अपलोड केली आहे, त्याची कुठलीही यादी किंवा माहिती शेतकऱ्यांना दिली जात नाही.

त्यामुळे आपले नाव सवलतीच्या किंवा कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट आहे, की नाही याचा उलगडाच शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा बॅंकेच्या तालुका किंवा ग्रामीण शाखांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्येही असाच प्रकार सुरू आहे.

कर्ज भरावे कसे?
दीड लाखावर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आपले नाव कर्जमाफीच्या यादीत आहे की नाही, याचा उलगडा झालेला नाही. ३१ मार्चपर्यंत दीड लाखावरील कर्ज भरून आपले थकीत खाते एनपीएतून (नॉन परफॉर्मिंग ऍसेट) बाहेर काढण्याचे निर्देश आहेत. परंतु कर्जमाफीच्या यादीत आपले नावच नसल्याने शेतकरी दीड लाखावरील कर्जही भरू शकत नसल्याची स्थिती आहे.

४० दिवसांपासून नवी यादीच नाही
जिल्हा बॅंकेला शासनाकडून ४० दिवसांपूर्वी २५ टक्के सवलत व कर्जमाफी यासंबंधीच्या याद्या प्राप्त झाल्या होत्या. त्यात ज्या त्रुटी होत्या, त्यांची नावे बॅंकेने शासनाकडे पुन्हा पाठविली. संबंधित दुरुस्त झालेली यादी व नवी यादी अद्यापही जिल्हा बॅंकेला प्राप्त झालेली नाही. सोसायट्यांचे सचिव जागेवर राहत नाहीत.  त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.

३१ मार्चपर्यंत दीड लाखावरील कर्ज भरायचे निर्देश शासनाने कर्जमाफी योजनेसंबंधी दिले आहेत. परंतु अजून दीड लाखावरील थकबाकीदार शेतकऱ्यांना आपले नाव कर्जमाफीच्या यादीत आहे की नाही, याचाच उलगडा झालेला नाही. नव्या याद्या सोसायटीत आलेल्या नाहीत.
- प्रदीप पाटील, शेतकरी, करंज, जि. जळगाव

इतर बातम्या
खानदेशात टॅंकरचा आकडा शंभरी पारजळगाव  : खानदेशात पाणीटंचाई तीव्र होत आहे....
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नागपुरात लघुसिंचनचे बारा तलाव कोरडेहिंगणा, नागपूर : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
गिरणाच्या पाण्यासाठी आज रास्ता रोकोजळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे गिरणा पट्ट्यातील...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
सोलापूर जिल्ह्यात टँकरचा आकडा सव्वाशेवरसोलापूर  : जिल्ह्यात उन्हाच्या वाढत्या...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
सांगली जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सांगली ः साखर कारखान्यांच्या गळीत हंगामातील...
देहूगाव-लोहगाव गटातून शिवसेनेच्या शैला...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
शेतकरी कंपन्यांमार्फत रेशीम धागा...परभणी ः ‘‘शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या स्‍थापन करून...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....