पडताळणीच्या चक्रात अडकली कर्जमाफी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला ः शासनाच्या कर्जमाफी योजनेचा अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत मिळून १३३ लाभार्थ्यांना आतापर्यंत फायदा झाला असून, उर्वरित हजारो शेतकरी अद्यापही ‘कधी मिळते कर्जमाफी’ अशी विचारणा करीत अाहेत. याद्यांच्या पडताळणीतील गोंधळ अद्यापही मिटलेला नसल्याने शेतकरी अद्याप वेटिंगवर अाहेत.

राज्य शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली असून, अकोला जिल्ह्यात एक लाख ९१ हजार १८७ शेतकरी पात्र ठरले अाहेत. यात जिल्हा बँकेचे एक लाख १२ हजार ४०६ खातेदार, तर ७८ हजार ७८१ हे राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार अाहेत.

अकोला अाणि वाशीम जिल्ह्यांत असलेल्या ८३५ सेवा सहकारी सोसायट्यांचा डाटा सरकारच्या पोर्टलवर अपलोडसुद्धा झाला अाहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांचे काम अद्यापही गतिशील झालेले नाही. अपलोड झालेल्या याद्यांमधील नावांना विविध निकष लावून तपासणी केली जाईल. त्यानंतर अंतिम पात्र शेतकरी निवडले जाणार अाहेत.

वास्तविक अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांची यादी चावडीवर वाचण्यात अाली. चावडीवाचनाच्या माध्यमातून अचूक ठरणाऱ्या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर ही यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. पुन्हा शासन स्तरावरही या यादीला चाळणी लावली गेली. सरकारने ‘दिवाळी’चा मुहूर्त साधून शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानही केला. सन्मानित केलेल्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी यादीची पडताळणी केली असता अपात्र ठरले. हा सगळा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. गावागावांत सध्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरच चर्चा झडताना दिसतात.

‘अापले सरकार’नंतर अाता महा-अाॅनलाइनही कर्जमाफीच्या याद्या ‘अापले सरकार’ या पोर्टलवर अपलोड करण्याचे अादेश यंत्रणांना देण्यात अाले होते. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू अाहे. अद्याप एकाही जिल्ह्याचे १०० टक्के काम झालेले नाही. अाता ‘अापले सरकार’एेवजी महा-अाॅनलाइवरसुद्धा याद्या अपलोड करण्याचे अादेश धडकले अाहेत. त्यानुसार पुन्हा अाता नव्याने या पोर्टलवर याद्या अपलोड करण्याचे काम सुरू झाले अाहे. ही तांत्रिकदृष्ट्या सोय असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या नवीन अादेशवजा फेरबदलाबाबत कुणीही अधिकृत बोलायला तयार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com