agriculture news in Marathi, deception of onion farmers for 32 lacks in Nashik, Maharashtra | Agrowon

नाशिकमध्ये कांदा उत्पादकांची ३२ लाखांची फसवणूक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नाशिक : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील तीन कांदा व्यापाऱ्यांनी शहर परिसरासह नांदगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील १५७ शेतकऱ्यांची तब्बल ३२ लाख ४३ हजार १९७ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बाजार समितीतर्फे मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील तीन कांदा व्यापाऱ्यांनी शहर परिसरासह नांदगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील १५७ शेतकऱ्यांची तब्बल ३२ लाख ४३ हजार १९७ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बाजार समितीतर्फे मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाड बाजार समितीत लिलावानंतर शेतमाल मिळाल्यानंतर व्यापारी शेतकऱ्यांना कधी रोख तर कधी चेकने पैसे अदा करतात. बाजार समितीतील अंबादास लष्करे (चामुंडा इंटरप्रायझेस), सागर गुंजाळ (शशिकांत ट्रेडिंग कंपनी), मनोहर गोसावी (श्रीहरी ओम ट्रेडर्स), राजू दातकर व मोहनलाल चौधरी या पाच व्यापाऱ्यांनी जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये कांदा खरेदी करीत १५७ शेतकऱ्यांना चेक दिले. 

शेतकऱ्यांनी ते चेक आपापल्या बँक खात्यांमध्ये जमा केले; मात्र व्यापाऱ्यांच्या खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने चेक बाउंस झाले. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना माहिती दिली. लवकरच तुमचे पैसे अदा करू, असे या व्यापाऱ्यांनी आश्वासन दिले. परंतु, वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या. बाजार समिती प्रशासनानेही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्यास सांगितले. व्यापाऱ्यांनी काही मुदत मागितली. मात्र, त्यानंतरही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. त्यामुळे अखेर या व्यापाऱ्याविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

... अन्यथा सोमवारपासून उपोषण
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे. त्यांनी १५ तारखेपर्यंत पैसे अदा न केल्यास सोमवार, १६ एप्रिलपासून बाजार समितीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा माजी आमदार संजय पवार, नागापूरचे माजी सरपंच अशोक पवार यांच्यासह इतरांनी दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...