agriculture news in marathi, Decision not to register Bt seeds in advance | Agrowon

बीटी बियाण्यांची आगाऊ नोंदणी न करण्याचा निर्णय
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

जळगाव : राज्यात यंदा कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस बियाणे विक्रेते व वितरकही सावध झाले आहेत. यामुळे कुठल्याही बियाण्याची आगाऊ नोंदणी कापूस बियाणे कंपन्यांकडे न करण्याचा निर्णय विक्रेते व वितरकांनी घेतला अाहे. परिणामी सुमारे तीन कोटींची बियाणे नोंदणीसंबंधीची उलाढाल जिल्ह्यात थांबेल, अशी माहिती आहे.

जळगाव : राज्यात यंदा कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस बियाणे विक्रेते व वितरकही सावध झाले आहेत. यामुळे कुठल्याही बियाण्याची आगाऊ नोंदणी कापूस बियाणे कंपन्यांकडे न करण्याचा निर्णय विक्रेते व वितरकांनी घेतला अाहे. परिणामी सुमारे तीन कोटींची बियाणे नोंदणीसंबंधीची उलाढाल जिल्ह्यात थांबेल, अशी माहिती आहे.

जिल्हा कापूस लागवडीत राज्यात पहिला आहे. पूर्वहंगामी कापूसही जिल्ह्यात एक लाख १८ हजार हेक्‍टरपर्यंत असतो. एप्रिल महिन्यापासून कापूस बियाणे आगाऊ नोंदणी, जाहीरातबाजी जिल्ह्यात सुरू होते. कापूस बियाणे विक्रेते १८०० असून, यातील कमाल विक्रेते मागणी असलेल्या बीटी कापूस वाणाची संबंधित कंपनीकडे नोंदणी करायचे. यातून दरवर्षी किमान तीन कोटींची उलाढाल व्हायची. परंतु यंदा कापसाचे पीक गुलाबी बोंड अळीने पुरते संकटात आले. पीक उपटून फेकावे लागले. उत्पादन खर्चही निघाला नाही. शेतकऱ्यांमध्ये बीटी कापूस वाणांच्या तक्रारी अधिक आहेत. त्यांना भरपाईदेखील मिळालेली नाही.

खानदेशचे पूर्ण अर्थकारण यंदा कापसावर बोंड अळी आल्याने कोलमडले. अशात कुठल्याही कापूस बियाणे उत्पादक कंपनीचे बियाणे आगाऊ नोंदणी करून मागविणार नसल्याचा निर्णय जिल्ह्यातील बियाणे वितरक व विक्रेत्यांनी घेतला आहे. या संदर्भात नुकतीच शहरात जिल्हा खते व बियाणे वितरक असोसिएशनची बैठक झाली. अध्यक्षस्थानी विनोद तराळ होते. तसेच सर्व पदाधिकारी, काही सदस्य उपस्थित होते.

कापूस बियाणे नोंदणी न करण्याचे निर्देश संघटनेच्या नेत्यांनी दिले आहेत. ते पाळून आम्ही जिल्ह्यात कुठल्याही कापूस बियाण्याची नोंदणी न करण्याची भूमिका घेतली आहे.
- विनोद तराळ, अध्यक्ष, जळगाव जिल्हा खते व बियाणे वितरक असोसिएशन

कापूस बियाणे नोंदणीसंबंधी शासनाचीदेखील कठोर भूमिका आहे. नोंदणीत ज्या बियाण्यांची अधिक मागणी असते तिचे बियाणे मिळत नाही. यंदा बोंड अळी व दुष्काळी स्थितीमुळे कापूस उत्पादकांना फटका बसला असून, बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्‍यता आहे.
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव जिल्हा परिषद

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...