agriculture news in marathi, declaration in zila parishad, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात घोषणाबाजी
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांसाठी देण्यात येणाऱ्या निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषदेकडून सरकारने काढून घेतले आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता.२०) जिल्हा परिषदेत रस्त्यांच्या कामाबाबात आयोजित केलेल्या सभेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आक्रमक झालेल्या भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य सदस्यांनी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी बसलेल्या डायससमोर येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शासन निर्णय निघण्याआधी कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांच्या निविदा करून कार्यारंभ आदेश देण्याचा सभेने ठराव केला आहे.

नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांसाठी देण्यात येणाऱ्या निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषदेकडून सरकारने काढून घेतले आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता.२०) जिल्हा परिषदेत रस्त्यांच्या कामाबाबात आयोजित केलेल्या सभेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आक्रमक झालेल्या भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य सदस्यांनी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी बसलेल्या डायससमोर येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शासन निर्णय निघण्याआधी कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांच्या निविदा करून कार्यारंभ आदेश देण्याचा सभेने ठराव केला आहे.

जिल्हा परिषदेमार्फत कामे करण्यात येणाऱ्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जातो. त्यानंतर जिल्हा परिषद त्या निधी वाटपाबाबत नियोजन करते. मात्र १५ दिवसांपूर्वी सरकारने एक अध्यादेश काढून जिल्हा परिषदेकडून रस्त्यांच्या कामाचे अधिकार काढून घेतले. त्यामुळे या निर्णयावर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेत शनिवारी शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे, उमेश परहर या वेळी उपस्थित होते.

सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगर जिल्ह्यामधील ७२ कामांना २१ सप्टेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. अध्यादेश ६ ऑक्‍टोबरला निघाला, मग मधल्या पंधरा दिवसांच्या काळात निविदा काढून कार्यारंभ आदेश का दिले नाही, असा प्रश्‍न सुनील गडाख यांनी उपस्थित केला. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी निधी नसल्याचे कारण सांगितले, तर मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी निधी सप्टेंबरमध्ये आल्याचे सांगितले आणि गोंधळ उडाला.

त्यानंतर सदस्यांनी अध्यक्षांच्या डायससमोर येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पदाधिकाऱ्यांनीही सदस्यांच्या सुरात सूर मिसळला. यात भाजपचे सदस्य एकाकी पडल्याचे दिसले. रस्त्यांचे अधिकार काढण्यावरून आता न्यायालयीन लढाई लढण्याचा निश्‍चय जिल्हा परिषदेने केला.

इतर ताज्या घडामोडी
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...
अमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणीअमरावती  ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी...
वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा ः...यवतमाळ  ः वन्यप्राण्यांचा जिव्हाळा...
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...