agriculture news in marathi, Decrease in farm productivity; No guarantees | Agrowon

खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेना
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद सोयाबीनच्या उत्पादनात सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत घट आली आहे. शासनाने जाहीर केलेले हमी दरही कागदावरच असल्याने शेतकऱ्यांना आपला माल मिळेल त्या दराने विकण्याशिवाय पर्याय नाही.

औरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद सोयाबीनच्या उत्पादनात सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत घट आली आहे. शासनाने जाहीर केलेले हमी दरही कागदावरच असल्याने शेतकऱ्यांना आपला माल मिळेल त्या दराने विकण्याशिवाय पर्याय नाही.

मराठवाड्यात सोयाबीनची १९ लाख ३३ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. त्यापाठोपाठ मुगाची १ लाख ६५ हजार हेक्‍टरवर, तर उडदाची १ लाख ५४ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. प्राप्त माहितीनुसार मराठवाड्यात मुगाची सरासरी हेक्‍टरी उत्पादकता ४ क्‍विंटल २ किलो आहे. त्या तुलनेत मुगाचे हेक्‍टरी ३ क्‍विंटल ५२ किलो उत्पादन आले आहे. उडदाचे हेक्‍टरी उत्पादन ४ क्‍विंटल २१ किलो आहे. त्या तुलनेत यंदा मराठवाड्यात मुगाचे हेक्‍टरी ४ क्‍विंटल उत्पादन आले. सोयाबीनची हेक्‍टरी सरासरी उत्पादकता ८ क्‍विंटल ७६ किलो आहे. त्या तुलनेत निम्म्यापेक्षा थोडे जास्त अर्थात हेक्‍टरी ५ क्‍विंटल १४ हजार रुपये हेक्‍टरी उत्पादन आले आहे.

हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये मूग, उडीद, सोयाबीनची उत्पादकता सरासरीपेक्षा थोडी जास्त आहे. औरंगाबादमध्ये मूग, उडदाची उत्पादकता सरासरी उत्पादकतेच्या निम्म्यापेक्षाही खूप कमी; तर सोयाबीनची उत्पादकता सरासरी उत्पादकतेच्या निम्म्यापेक्षा थोडी जास्त आली आहे. बीड जिल्ह्यात सरासरी ८ क्‍विंटल ३२ क्‍विंटल हेक्‍टरीच्या तुलनेत केवळ २ क्‍विंटल २० किलो आली आहे. उडदाची उत्पादकता सरासरी इतकी असली, तरी मुगाची उत्पादकता हेक्‍टरी केवळ २ क्‍विंटल ३८ किलोच आली आहे.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १५ ऑगस्टपासून मूग व उडदाची आवक झाली. १२ ऑक्‍टोबर अखेरपर्यंत औरंगाबाद बाजार समितीमध्ये ७७७ क्‍विंटल मुगाची आवक झाली. या मुगाला ४ हजार ते ५७५१ रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत दर मिळाला. उडदाची आवक ९३ क्‍विंटल, तर दर ३४०० ते ४३७४ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

जालना बाजार समितीमध्ये मुगाची १३ ऑगस्टपासून, तर उडदाची सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आवक सुरू झाली. १० आॅक्‍टोबरपर्यंत जालना बाजार समितीमध्ये मुगाची ४५ हजार क्‍विंटल आवक झाली. या मुगाला ३००० ते ६०५१ रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळालेल्या मुगाचे सरासरी दर ४९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. तर, ९८०० क्‍विंटल आवक झालेल्या उडदाला २८०० ते ४४११ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. उडदाचे सरासरी दर ३९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

लातूर बाजार समितीमध्ये मुगाची ५२३५३ क्‍विंटल आवक झाली. या मुगाला ३५५० ते ६०५१ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मुगाचे सरासरी दर ४८५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५९१३० क्‍विंटल आवक झालेल्या उडदाला २७५० ते ४७४० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. उडदाचे सरासरी दर ४२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बीड बाजार समितीमध्ये मूग उडदाची दखलपात्र आवक झालीच नाही. तर, सोयाबीनची सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये जवळपास ३४०० क्‍विंटल आवक झाली. सोयाबीनला २९०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...