agriculture news in marathi, Decrease the rate of sugarcane Action should be taken against the factories | Agrowon

जाहीर ऊसदर कमी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

सातारा : ज्या साखर कारखान्यांनी ऊस गाळप केल्यापासून १५ दिवसांत पहिला हप्ता दिलेला नाही, त्या कारखान्यांनी व्याजासह द्यावा आणि जाहीर केलेला दर कमी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला.

सातारा : ज्या साखर कारखान्यांनी ऊस गाळप केल्यापासून १५ दिवसांत पहिला हप्ता दिलेला नाही, त्या कारखान्यांनी व्याजासह द्यावा आणि जाहीर केलेला दर कमी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला.

मुख्यमंत्री इस्लामपूर येथील कार्यक्रमासाठी येथील विमानतळावरून रवाना झाले. तत्पूर्वी बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मुल्ला, बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सागर कांबळे, विक्रम थोरात, उत्तमराव खबाले यांच्यासह बळिराजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह पृथ्वीराज देशमुख, विठ्ठल रुक्‍मिणी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, मुकुंद चरेगावकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील काही कारखाने सुरू होऊनही नियमाप्रमाणे ऊस गाळप केल्यानंतर १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पहिले बिल दिलेले नाही. त्यामुळे संबंधित कारखान्यांनी व्याजासह पहिला हप्ता शेतकऱ्यांना द्यावा, त्याचबरोबर साखरेचे दर पडल्याचे कारण सांगून दर कमी करण्याचा प्रयत्न कारखानदारांकडून होत आहे.

त्यामुळे अशा कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी बळिराजा शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याचबरोबर कारखानदारांनी व्याजासह ऊसबिल द्यावे, अशी मागणी करत प्रसंगी मुंबईत मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...