agriculture news in marathi, Decrease in water level of 'Krishna' | Agrowon

‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा होणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील पंपगृहात मागील आठवड्याच्या तुलनेत सहा फूट पाणीपातळी घटली आहे. परिणामी, योजनेच्या व्यवस्थापन विभागाने पहिल्या टप्प्यातील चालू पंपाची संख्या २४ वरून १५ इतकी केली आहे. 

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा होणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील पंपगृहात मागील आठवड्याच्या तुलनेत सहा फूट पाणीपातळी घटली आहे. परिणामी, योजनेच्या व्यवस्थापन विभागाने पहिल्या टप्प्यातील चालू पंपाची संख्या २४ वरून १५ इतकी केली आहे. 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची मागणी वीस दिवसांत जवळपास शंभर पंप या विक्रमी नोंदीसह सुरू आहे. यामुळे दुष्काळी भागातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत मिळाली आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट होण्यास सुरवात झाली आहे. याचा परिणाम या योजनेवर होत आहे. योजनेचा पहिला टप्पा म्हैसाळ येथे आहे. या ठिकाणी असणारी पाणीपातळी अतिशय कमी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दोन दिवसांपूर्वी ६२७ इतकी होती. ती ६२० फूट इतकी झाली आहे.

उपसा करणारे पंप नाइलाजाने कमी करावे लागत आहेत. पहिल्या टप्प्यात २४ पंपापैकी १५ पंप सुरू ठेवणेच शक्य आहे. त्यामुळे ९ पंप बंद करण्यात आले आहेत.  त्याचा परिमाण उर्वरित टप्प्यातील पंपावर होणार आहे. जतमधील तीन उपसा सिंचन योजनेतील सर्व पंप बंद होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सध्या कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यातून योजना सुरू आहे. पण, त्याच पाण्यावर म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजनाही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे कोयनेतील विसर्ग तीन योजनांसाठी कमी पडला आहे. त्यामुळे पंप बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला असल्याची माहिती सूत्रांंनी दिली. 
ही योजना पंधरा जूनपर्यंत सुरू ठेवण्याचा विचार आहे. सध्या कोयनेतून पाणी कमी आल्याने हे संकट आले आहे. परंतु, कोयना धरणात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरेल इतके पाणी आहे. 

वारणातून विसर्ग सुरू
सध्या वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  त्यामुळे हे पाणी म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्यापर्यंत येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. त्यानंतर बंद केलेले पंप सुरू करण्यात येतील.
 

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...